छत्रपती संभाजीनगरात एक दिवसाआड पाणी येणार, ३ लाख नागरिकांना ११ जलकुंभांची भेट

By मुजीब देवणीकर | Published: August 18, 2023 07:32 PM2023-08-18T19:32:29+5:302023-08-18T19:32:43+5:30

दिवाळीपूर्वी ०४ जलकुंभ मनपाला मिळणार असल्याची माहिती

Water scarcity will be removed, 3 lakh people of Chhatrapati Sambhajinagar will be gifted 11 water tanks | छत्रपती संभाजीनगरात एक दिवसाआड पाणी येणार, ३ लाख नागरिकांना ११ जलकुंभांची भेट

छत्रपती संभाजीनगरात एक दिवसाआड पाणी येणार, ३ लाख नागरिकांना ११ जलकुंभांची भेट

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : नवीन पाणीपुरवठा योजनेचा शहराला त्वरित फायदा कसा मिळेल यादृष्टीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे कामाला लागली आहेत. ११ जलकुंभांचे काम पूर्णत्वाकडे असून, त्यातील ०४ जलकुंभ दिवाळीपूर्वी महापालिकेकडे सुपूर्द करण्यात येतील. वर्षाखेरीस उर्वरित ०७ जलकुंभ दिले जातील. यामुळे ०३ लाखांहून अधिक नागरिकांना याचा मोठा फायदा होईल. जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत ९०० मिमी व्यासाची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम युद्धपातळीवर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सुरू आहे. हे काम जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण होईल. मार्चपूर्वी शहरात अतिरिक्त ८० एमएलडी पाणी आणण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे.

काय फायदा होणार
शहराला एक दिवसाआड पाणी येणार
८० एमएलडी पाणी अतिरिक्त मिळणार

येणारा उन्हाळयात दिलासा
दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड ओरड होते. येणारा उन्हाळा शहरवासीयांना दिलासा देणारा ठरेल असे संकेत मिळत आहेत. २७४० कोटी रुपयांच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतील ५४ पैकी ११ जलकुंभ पूर्ण होत आले. काही जलकुंभांची तपासणीसुद्धा सुरू करण्यात आली.

पूर्वीच्या तुलनेत काम गतीने सुरू
नियोजित वेळापत्रकानुसार सर्व कामे होतील असा दावा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आला आहे. कोणत्याही परिस्थितीत मनपाला मिळणार यादृष्टीने काम सुरू आहे. जलवाहिन्या टाकणे, जलकुंभ उभारण्यासाठी मुजरांची संख्याही वाढविली. पूर्वीच्या तुलनेत काम गतीने सुरू आहे. सोबतच जायकवाडीत कॉफर डॅमची उंचीही वाढविली जात आहे.
-आर. एस. लोलापोड, मुख्य अभियंता, मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.

कोणते चार जलकुंभ अगोदर मिळणार?
जलकुंभ- क्षमता- हस्तांतरण तारीख- लोकसंख्या
हनुमान टेकडी- २१.३५ लाख लिटर्स- ३१.०८.२३- २२,९२८
टीव्ही सेंटर- १६.५५-----------३१.०८.२३- २१,८८२
हिमायत बाग- ३७.०९---------३०.०९.२३-४१, २५०
दिल्लीगेट- ३०.०७-----------३१.१०.२३-४३,३५२

दुसऱ्या टप्प्यात ०७ जलकुंभ मिळणार
जलकुंभ- क्षमता- लोकसंख्या
प्रतापनगर - ७.९५ लाख लिटर्स- - १०,०४७
शाक्यनगर- २६.०५---------२७,७११
मिसरवाडी-गरवारे-१९.०३-----१७,१९८
शिवाजीनगर एन-२- ३४.६५----५०,६५०
ज्युबली पार्क- १६.९५----------२३,८७०
पारिजातनगर- ११.४५---------१५,५०९
किटली गार्डन- २४.१५---------२५,१३८

Web Title: Water scarcity will be removed, 3 lakh people of Chhatrapati Sambhajinagar will be gifted 11 water tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.