माहूर शहरावर नियोजनाअभावी पाणीटंचाईचे सावट
By Admin | Published: December 15, 2015 11:49 PM2015-12-15T23:49:39+5:302015-12-15T23:54:08+5:30
इलियास बावाणी, माहूर पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तींनी उचलल्याने (फोडून टाकल्याने) बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णपणे वाहून गेला
इलियास बावाणी, माहूर
श्रीक्षेत्र माहूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पैनगंगा नदीपात्रातील कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट अज्ञात व्यक्तींनी उचलल्याने (फोडून टाकल्याने) बंधाऱ्यातील पाणीसाठा पूर्णपणे वाहून गेला असून पैनगंगा नदीपात्रा कोरडेठाक पडले आहे़ परिणामी माहूर शहरासह श्रीरेणुकादेवी संस्थानवर भीषण जलसंकट ओढवले असून हिंगणी येथील मोठ्या बंधाऱ्यातील पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडून गेट दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे़
शहरात गेल्या ३० वर्षाआधी नळयोजना बनविण्यात आली होती़ ही योजना कालबाह्य होवूनही या योजनेद्वारे शहरातील २४५० घरांपैकी फक्त ८०० घरांना कधीकधी पाणीपुरवठा होतो़ निसर्गकृपेने विहिरी व बोअरच्या पाण्यावर येथील मालमत्ताधारक आपली तहान भागवित असून नदीपात्रातील दूषित पाणी पिण्यासाठी नागरिक वापरत असल्याने नागरिकांना गंभीर आजार होत आहे़
शहरात गेल्या दोन वर्षाआधी १३ कोटी रुपयांची नळयोजना मंजूर करण्यात आली़ परंतु या योजनेची देयके अद्याप निकाली न निघाल्याने हे काम संथगतीने सुरू आहे़ पैनगंगा नदीपात्रात धनोडा शेकापूर पुलाजवळ माजी आ़डी़बी़ पाटील यांच्या काळात कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आला़ या बंधाऱ्यात टाकण्यात आलेल्या प्लेटापैकी १२३ प्लेटा चोरी गेल्या़ याचाही तपास अद्याप लागला नाही़ त्यामुळे आ़प्रदीप नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे व सर्व लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे त्या प्लेटा पाटबंधारे विभागाने तकलादू स्वरुपाच्या बसवून दिल्या़ त्यामुळे पाणी अडले़ परंतु पाझर रोखण्यात यश आले नाही व पुरामुळे बंधाऱ्याच्या बाजूचा नदीपात्राचा भाग वाहून गेल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाणी अडले नव्हते़ त्यातल्या त्यात अज्ञात आरोपींनी या बंधाऱ्याचे गेट सब्बलद्वारे फोडून टाकून वर उचलले गेल्याने संपूर्ण पाणी वाहून गेले असून पैनगंगा नदीपात्र कोरडेठाक पडले आहे़
नळयोजनेचे पाणी नसल्याने विहिरी, बोअरच्या पाण्याचा उपसा प्रचंड वाढल्याने जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने खाली जात असल्याने विहिरी, बोअर कोरडे पडत आहेत़ खाजगी १ हजार लिटरचे टँकर २५० रुपयांना विक्री होत असून शहरातील नळ बोअर विहिरी नसलेल्या रहिवाशांना पाणीटंचाईचे चटके जाणवू लागल्याने कर्मचारी वर्ग आपापली मुले गावी पाठविण्याच्या विचारात असून हॉटेल, लॉजिंग मालकांना पाणीटंचाईमुळे पाणी वापराबाबत ग्राहकांना काटकसर करण्याच्या सूचना काऊंटरवर लिहून ठेवावी लागत आहे़
येत्या २४ तारखेला शहरात दत्तजयंतीनिमित्त येणाऱ्या लाखो भाविकांना पाणी कोण व कसे पाजणार हा मोठा प्रन उभा राहिला आहे़ कोल्हापुरी बंधऱ्याचे गेट दुरुस्ती करून येथे २४ तास सुरक्षा रक्षक नेमून नदीपात्रात हिंगणी बंधाऱ्यातील पाणी सोडून नळयोजनेचे पाणी मुबलक प्रमाणात पुरवठा करण्याची मागणी होत आहे़ सोबतच सुरू असलेल्या नळयोजनेचे अंतिम टप्प्यात असलेले काम लवकर पूर्ण करून नवीन नळयोजना एका महिन्यात कार्यान्वित करण्याची मागणी जोर धरत आहे़
मुखेड, लोहा तहसीलदारांना घेराव
मुखेड : राशनधारकांच्या बोगस स्वाक्षऱ्या व अंगठे मारून स्वस्त धान्य दुकानांचे राशन कार्ड बेटमोगरा सेवा सहकारी सोसायटीला बोगसरित्या जोडण्याचा प्रकार उघडकीस येताच संतप्त लाभार्थ्यांनी तहसीलदारांना घेराव घातला़ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने जमाव संतप्त झाला़
बेटमोगरा येथील राशन दुकान सतत वादग्रस्त ठरत आले आहे़ येथून लाभधारकांना धान्य वाटप केले जात नव्हते़ त्यामुळे तहसीलदार एस़ पी़ घोळवे यांनी ५५५ राशनकार्ड आॅगस्ट २०१५ मध्ये मौजे माऊली येथील राशन दुकानास जोडले होते़ पण आॅगस्ट-सप्टेंबर या दोन महिन्याचे राशन वाटप करण्याची जबाबदारी बेटमोगरा सेवा सहकारी सोसायटीला देण्यात आली होती़ सोसायटीने सप्टेंबर, आॅक्टोबर या दोन महिन्याचे धान्य वाटप केले नसल्याचा आरोप आहे़ ही बाब लक्षात येताच संतप्त कार्डधारकांनी तहसील कार्यालयात घुसून तहसीलदारांना घेराव घातला व सोसायटीची चौकशी करण्याची मागणी केली़ अचानक कार्डधारक कार्यालयात घुसल्याने तहसीलदारांनी लगेच पोलिसांना पाचारण केले़ पोलिसांनी मध्यस्थी करून संतप्त कार्डधारकांना शांत केले़ कार्डधारकांच्या तक्रारीवरून योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन तहसीलदार घोळवे यांनी दिले़ तहसीलदारांच्या आदेशानुसार १३१ कार्डधारकांचे उशिरापर्यंत जबाब घेण्याचे काम सुरू होते़ याकामी नायब तहसीलदार सुनील पांडे, के़व्ही़मस्के, तलाठी बालाजी बोरसुरे, रवि कापसे यांनी जबाब घेतले़ उर्वरित कार्डधारकांचे जबाब व तक्रारी १६ डिसेंबर रोजी बेटमोगरा येथे नोंदविण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार मस्के यांनी सांगितले़
तहसीलदारांनी जबाब व तक्रारी नोंदवून घेतल्याने आम्ही समाधानी असल्याचे तक्रारकर्ते दत्ता पाटील मुदळे यांनी सांगितले़ गावात दुष्काळ पडला असून राशन दुकानदार धान्य वाटप व रॉकेल वितरण करीत नसल्याची तक्रार मालु सोनकांबळे यांनी केली़ याशिवाय राशन दुकानदार उद्धट शब्द वापरत असल्याचे साहेराबी कुरेशी, हनीफाबी कासीमसाब या महिलांनी सांगितले़ न्याय द्या, नाहीतर जेलमध्ये घाला, तिथेतरी भाकर खायला मिळेल असे सुमनबाई गाजलवाड म्हणाल्या़ तहसीलदारांना निवेदन देताना दत्ता पाटील मुदळे,