पालेभाज्यांच्या अडत बाजारात पाणीबाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:07 AM2018-04-16T01:07:45+5:302018-04-16T01:07:51+5:30

जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत पिण्याचे पाणी नसल्याने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे हाल होत आहेत.

Water shortage in Jadhav wadi market | पालेभाज्यांच्या अडत बाजारात पाणीबाणी

पालेभाज्यांच्या अडत बाजारात पाणीबाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील पालेभाज्यांच्या अडत बाजारपेठेत पिण्याचे पाणी नसल्याने शेतकरी, व्यापारी व ग्राहकांचे हाल होत आहेत.
बाजार समितीने फळ-पालेभाज्यांच्या अडत बाजारातील पाणीपुरवठ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. यामुळे या बाजारपेठेत पाणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या परिसरात विहीर आहे. त्या विहिरीवरून संपूर्ण अडत बाजारपेठेला पाणीपुरवठा केला जातो. मात्र, पाणी नसल्याने पुरवठा बंद पडला आहे. येथील पाण्याचा टाक्या शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. कारण टाक्यांमध्ये पाणी टाकले जात नाही. फक्त हौद भरला जातो. मात्र, त्याचेही पाणी पुरत नाही. येथे अडत व किरकोळ व्यापारी, शेतकरी, ग्राहक मिळून दररोज ८ ते १० हजार लोक येत असतात. व्यापाऱ्यांना पिण्यासाठी जार मागवावे लागत आहेत. अशीच परिस्थिती धान्याच्या अडत बाजारात आहे. बाजार समितीने पाणीटंचाई लक्षात घेऊन परिसरात पाणीपुरवठा करावा, अशी मागणी येथील व्यापारी करीत आहेत.

Web Title: Water shortage in Jadhav wadi market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.