औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 12:23 PM2018-06-07T12:23:12+5:302018-06-07T12:24:26+5:30

जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात मंगळवारी सकाळी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता.

The water supply of Aurangabad city is still disrupted | औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच

औरंगाबाद शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच

googlenewsNext
ठळक मुद्दे बुधवारी दिवसभर पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस मनपा कार्यालयात सुरू होता.

औरंगाबाद : जायकवाडी येथील पाणीपुरवठा केंद्रात मंगळवारी सकाळी दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने सलग दुसऱ्या दिवशीही शहरातील पाणीपुरवठा विस्कळीतच होता. बुधवारी दिवसभर पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस मनपा कार्यालयात सुरू होता. पाणीपुरवठ्याची वितरण व्यवस्था सांभाळण्यासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट तरी नेमावा, अशी मागणी महापौर नंदकुमार घोडेले यांनी आयुक्तांकडे केली.

उन्हाळा संपला तरी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. मंगळवारी जायकवाडीत दोन तास वीजपुरवठा खंडित झाल्याने शहरातील अनेक वसाहतींना पाणीपुरवठा करता आला नव्हता. बुधवारी या वसाहतींना पाणी देण्याचा प्रयत्न महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला. बुधवारी ज्या वसाहतींना पाणी 

शहराचा पाणीपुरवठा अद्यापही विस्कळीतच
देण्याचा दिवस होता, त्यांना पाणीच मिळाले नाही. पडेगाव, त्याचप्रमाणे वॉर्ड क्र. ४३ येथे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता. मागील दोन दिवसांपासून शहरातील बहुसंख्य वसाहतींना किमान पिण्यापुरते का होईना पाणी देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा महापालिकेने केला.
पाणीपुरवठ्यातील विघ्न दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. पावसाळा सुरू झाला तरी नागरिकांची पाण्यासाठी प्रचंड ओरड सुरूच आहे. वितरण व्यवस्थेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ कन्सल्टंट तरी महापालिकेने नियुक्त करावा, अशी मागणी बुधवारी महापौरांनी आयुक्तांकडे केली.

नारळीबागेत ठणठणाट
नारळीबाग परिसरातील राजपूत कॉलनीत मागील दहा दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट सुरू आहे. या भागातील जुनी जलवाहिनी अत्यंत खराब झाली आहे. नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी बराच अवधी लागू शकतो. पाणी नसल्याने बुधवारी या भागातील महिला महापौरांकडे आल्या. त्यांनी या प्रकरणात मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. पिण्यासाठी किमान टँकर सुरू करण्याचे आश्वासनही देण्यात आले.

Web Title: The water supply of Aurangabad city is still disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.