साईबन सोसायटीत पाणीपुरवठा विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:02 AM2021-05-14T04:02:21+5:302021-05-14T04:02:21+5:30
-------------- चोरट्याने विद्युत पंप लांबविला वाळूज महानगर : विहिरीवरील विद्युतपंपाची चोरी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...
--------------
चोरट्याने विद्युत पंप लांबविला
वाळूज महानगर : विहिरीवरील विद्युतपंपाची चोरी करणाऱ्या चोरट्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रवींद्र दामोधर मोरे (रा.छावणी) यांची मेहंदीपूर शिवारात शेती असून, पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीवर ५ एचपी क्षमतेचा विद्युतपंप बसविला आहे. दरम्यान २९ एप्रिल रोजी चोरट्याने संधी साधून हा विद्युतपंप लांबविला आहे.
------------------------------
कोविड रुग्णालयात मदत वाटप
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लासूर स्टेशन येथील कोविड रुग्णालयात सॅनिटायझर, मास्क, अँटिजन किटची मदत दिली. आमदार प्रशांत बंब यांनी लासूरला कोविड रुग्णालय स्थापन केले आहे. रांजणगाव पंचायत समिती सदस्य दीपक बडे, समाधान बडे, अजित बडे, योगेश चाटे, सोमेश इंगळे, शैलेश कारखेले, सोमनाथ नेमाने आदींनी ही मदत दिली आहे.
-------------------------------
इंद्रप्रस्थ कॉलनीत मोकाट जनावराचा संचार
वाळूज महानगर : बजाजनगरातील इंद्रप्रस्थ कॉलनीत मोकाट जनावरांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेक पशुपालक आपली पाळीव जनावरे चरण्यासाठी मोकाट सोडून देत असतात. ही मोकाट जनावरे रस्त्याने ये-जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जात असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घरासमोर झाडे व बागाही मोकाट जनावरे उद्ध्वस्त करीत असल्याने नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे.
---------------------------
दोघांना जखमी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
वाळूज महानगर : पंधरा दिवसांपूर्वी दुचाकीला मागून धडक देऊन दोघांना गंभीर जखमी करणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २९ मार्चला महेंद्र वामन बनकर हे मित्रासह दुचाकीने (एमएच २० डब्ल्यू ३९९०९) स्वार होऊन जात असताना साजापूर चौफुलीजवळ पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (क्र. एमएच २० एफएस ६९४२) जोराची धडक दिली होती. या अपघातप्रकरणी फरार दुचाकीस्वाराविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-------------------------------