पैठण शहराचा पाणीपुरवठा उद्या राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:03 AM2021-07-27T04:03:56+5:302021-07-27T04:03:56+5:30

जायकवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणा पाईपलाईनला पशुवैद्यकीय दवाखाना ते न्यायालय या दरम्यान मोठी गळती लागली. वे‌ळीच ...

The water supply of Paithan city will be closed tomorrow | पैठण शहराचा पाणीपुरवठा उद्या राहणार बंद

पैठण शहराचा पाणीपुरवठा उद्या राहणार बंद

googlenewsNext

जायकवाडी जलशुद्धीकरण केंद्रातून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भरणा पाईपलाईनला पशुवैद्यकीय दवाखाना ते न्यायालय या दरम्यान मोठी गळती लागली. वे‌ळीच दुरूस्ती न केल्यास जलवाहिनी फुटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मंगळवारी शहरास पाणीपुरवठा झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एका दिवसात जलवाहिनी दुरूस्ती करण्यात येईल, असे मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी सांगितले.

----

जलवाहिनी झाली जीर्ण

पैठण शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाल्याने वारंवार फुटत आहे. ती जलवाहिनी क्रॉंक्रीट बेड न करता सरळ काळ्या मातीत टाकण्यात आली आहे. पावसाळा व उन्हाळ्यात होणाऱ्या जमिनीच्या आकुंचन व प्रसरण प्रक्रियेत जलवाहिनीवर दाब येत असल्याने वारंवार जलवाहिनी फुटत असल्याचे समोर आले आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पैठण शहरासाठी नवीन समांतर जलवाहिनी टाकण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.

Web Title: The water supply of Paithan city will be closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.