विनाक्रमांकांचे पाणीपुरवठा टँकर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 01:23 AM2018-06-19T01:23:34+5:302018-06-19T01:24:03+5:30

एन-५ येथील जलकुंभावर विनाक्रमांकाचे व अनोळखी टँकर भरण्यास पालिकेने सोमवारपासून बंदी आणली आहे. तसेच टँकरच्या फेऱ्यांचे रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना आदेशित केल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले आहे.

Water supply for random numbers Tankers closed | विनाक्रमांकांचे पाणीपुरवठा टँकर बंद

विनाक्रमांकांचे पाणीपुरवठा टँकर बंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : एन-५ येथील जलकुंभावर विनाक्रमांकाचे व अनोळखी टँकर भरण्यास पालिकेने सोमवारपासून बंदी आणली आहे. तसेच टँकरच्या फेऱ्यांचे रेकॉर्ड तपासणी करण्यासाठी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांना आदेशित केल्याचे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले आहे.
लोकमतने १८ जूनच्या अंकामध्ये टँकरच्या फे-यांची तीन दिवस माहिती संकलन ३५ एमएलडी पाण्याची चोरी होत असल्याचा वृत्तांत प्रकाशित केला. त्या वृत्तांताची दखल घेत पालिका खडबडून जागी झाली. कार्यकारी अभियंता कोल्हे यांनी एन-५ येथील सर्व फे-यांचे रेकॉर्ड ताब्यात घेतले. दिवसभरात २५० च्या आसपास टँकर तेथून भरले जातात. सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतचा हा आकडा आहे. यानंतरही टँकर भरणे सुरूच असते. सिडको-हडको परिसराचे पाणी टँकरमधून मोठ्या प्रमाणात गायब होत आहे. येथील पम्पिंग स्टेशनवरून किती टँकर भरले जावेत, याचे काहीही नियोजन नाही.
चौकशी करण्यात येईल
सभापती राजू वैद्य यांनी सांगितले, या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. शहरातील नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होत नसताना टँकरचा गोरखधंदा खपवून घेतला जाणार नाही. दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्याच्या सूचना पाणीपुरवठा विभागाला पत्राद्वारे केल्याचे त्यांनी कळविले.
पालिका आयुक्तांनी कळविले
मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी कळविले की, या प्रकरणात मी स्वत:हून काही माहिती समजून घेईन. लोकमतने प्रकाशित केलेले वृत्त वाचल्यानंतर याप्रकरणी पूर्णत: माहिती संकलित करण्यासाठी मी कार्यकारी अभियंता कोल्हे यांना कळविले आहे.

Web Title: Water supply for random numbers Tankers closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.