फळबागांना टँकरने पाणी

By Admin | Published: April 20, 2016 11:45 PM2016-04-20T23:45:07+5:302016-04-20T23:50:00+5:30

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़

Water from tankers in horticulture | फळबागांना टँकरने पाणी

फळबागांना टँकरने पाणी

googlenewsNext

हदगाव : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिले जाते तो आज अडचणीत आहे़ अशाही प्रतिकुल परिस्थितीत जीवापाड सांभाळलेली फळबाग करपू लागल्याने मनाठा येथील संतोष मालीवाल या शेतकऱ्याने टँकरद्वारे पाणी आणून फळबाग वाचविण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे़
गेली १०-१२ वर्षांपासून जोपासलेली मोसंबीचे ५०० बुड यावर्षी वाचविणे त्यांना कठीण झाले़ १५ एकर जमिनीमध्ये असलेल्या या फळबागेत इतर कोणतेही पीक घेता येत नाही़ त्यामुळे वर्षाचे उत्पन्न या फळबागेवर घ्यावे लागते़ वातावरण बदलामुळे गत दोन वर्षे गारांचा फटका बसला़ त्याचा उत्पन्नावर फरक पडला़ शेतामध्ये पाच सालगडी आहेत़ वर्षाकाठी त्यांना अडीच ती-तीन लाख रुपये द्यावे लागतात़ काढायचे कुठून ज्या शेतामध्ये ही फळबाग आहे़ तिथे ५० फुट खोलीची विहीर आहे, पण फळबागेला पाणी कमी पडू लागल्याने त्यांनी दुसऱ्या शेतातील विहिरीचे पाणी टँकरद्वारे या विहिरीत आणून सोडण्याचा निर्णय घेतला़ यासाठी दिवसाआड पाचशे रुपये भाडे द्यावे लागते़ कधी तीन कधी चार फेऱ्या टँकरद्वारे केल्या जातात़ दोन्ही विहिरींचे मिळून हे पाणी फळबागेला देणे सुरू आहे़ उन्हाच्या तीव्रतेमुळे पाणी कमीच पडत आहे, असे त्यांनी सांगितले़
उन्हाळा आणखी दीड महिना आहे़ त्यामुळे पाणी किती दिवस पुरेल सांगता येत नाही़ ५०० बुडापैकी किती झाडे मरतील सांगणे कठीण आहे़ परंतु आपल्या शेतातील उभे पीक मरू नये, यासाठी कर्जबाजारी होवून हा शेतकरी खर्च करतो आहे़ (वार्ताहर)
मनाठा गाव डोंगराळ.जमिनीही हलक्या प्रतिच्याच़ पाण्याची व्यवस्थाही जेमतेमच़ कोरडवाहू जमिनी कसता कसता शेतकऱ्याच्या डोक्यात वेगवेगळ्या कल्पना येतात़ काही सुशिक्षित तरूण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग राबवित असतात़ गेल्या तीन वर्षापासून गावात पाणीटंचाई आहे़ शेतीत पेरलेलेही उगवले नाही, झालेला खर्चही निघाला नाही़ त्यामुळे शेतकरी हताश झाला़ कामाअभावी मजुरांनी स्थलांतर केले, अशा अवघड स्थितीत संतोष मालीवाल या शेतकऱ्याने पाच किलो मीटर अंतरावरून टँकरद्वारे मोसंबीच्या झाडाला पाणी देणे सुरू केले़ गावातील मोठे प्रस्थ पण त्यांनाही पाणीटंचाईने बेजार केले़ शेतामध्ये तीन विहिरी, एक अटली, तर दोन विहिरींना जेमतेमच पाणी, दोन विहिरींचे अंतर पाच किलो मीटरचे, त्यामुळे एका विहिरीचे पाणी दुसऱ्या शेतातील पिकाच्या काय कामी पडणार?

Web Title: Water from tankers in horticulture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.