भर पावसाळ्यात ‘पाणीबाणी’
By Admin | Published: August 19, 2016 12:32 AM2016-08-19T00:32:14+5:302016-08-19T01:02:53+5:30
बीड : जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. उद्भवांना पाणी आले, असा जावईशोध लावून प्रशासनाने सर्व टँकर बंद केले. आजघडीला जिल्ह्यातील ४०० हून अधिक गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.
बीड : जिल्ह्यात भरपूर पाऊस झाला. उद्भवांना पाणी आले, असा जावईशोध लावून प्रशासनाने सर्व टँकर बंद केले. आजघडीला जिल्ह्यातील ४०० हून अधिक गावांतील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडत आहेत. विशेष म्हणजे पाऊस लांबणीवर पडला तर पर्यायी पाणी उपलब्ध करून देण्याची जिल्हा प्रशासनाकडे कुठलीही उपाययोजना नाही. टँकरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात चकरा मारत आहेत.
आतापर्यंत एकूण ३०६.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. दुष्काळात १२०० च्या वर गावे, वाड्या-वस्त्यांवर पिण्याचे पाणी टँकरद्वारे दिले जात होते. पाऊस केवळ पिकांपुरताच झाल्याने पाण्याचे उद्भव कोरडेठाक आहेत. केज तालुक्यातील सुरडी, सोनेगाव, सांगवी, माळेगाव, सुकळी, साळेगाव, युसूफवडगाव, गोरेगाव ही गावे, तर बीड तालुक्यातील हिंगणी (बु.), पिंपरी, चौसाळा आदी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. ३१ जुलैनंतर टँकर देण्याचे प्रयोजन नसल्याचे कारण प्रशासन पुढे करीत आहे. त्यामुळे ग्रामस्थ दुहेरी कोंडीत सापडले आहेत. (प्रतिनिधी)