महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज

By Admin | Published: July 14, 2017 12:19 AM2017-07-14T00:19:53+5:302017-07-14T00:23:29+5:30

नांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे स्पष्ट केले.

We are ready for the municipal elections | महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज

महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : आगामी महापालिका निवडणुकीसाठी आम्हीही सज्ज असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी येथे स्पष्ट केले. गुरुवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीस प्रारंभ झाला आहे. आॅक्टोबर २०१७ मध्ये होणाऱ्या मनपा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभाग रचनेसह आरक्षण सोडतही घोषित केली आहे. या आरक्षण सोडतीवर १९ जुलैपर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत. प्रशासकीय स्तरावर या निवडणुकीची तयारी सुरू आहे. राजकीय पक्षही कामाला लागले आहेत़ सेना भाजपाच्या बैठकीच्या स्वतंत्र फेऱ्या सुरू आहेत़ तर काँग्रेसने उमेदवारीसाठी अर्जही मागविले आहेत़ या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी गुरूवारी पत्रकारांशी संवाद साधला़ राज्यातील कारभारावर निशाणा साधताना त्यांनी सरकारवर टीका केली़ त्याचवेळी स्थानिक पातळीवर होणाऱ्या नांदेड महापालिकेच्या निवडणुकीवरही खा. चव्हाण यांनी भाष्य केले.
आम्हीही या निवडणुकीसाठी सज्ज आहोत. महानगराध्यक्ष व त्यांच्या टीमकडून निवडणुकी संदर्भातील आखणी केली जात असल्याचे ते म्हणाले. काँग्रेसमधील काही नगरसेवक भाजपाच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबाबत त्यांना विचारले असता असे काही घडणार नसल्याचे ते म्हणाले.
एमआयएमच्या दहा नगरसेवकांचा काँग्रेस प्रवेश कधी होणार? या प्रश्नावर सर्व काही होईल. घाई करण्याची आवश्यकता नसल्याचेही ते म्हणाले. राष्ट्रवादीसोबत आघाडीबाबत विचारले असता त्याबाबत पुढे निर्णय घेतला जाईल, असे सांगितले़ अजून निवडणुकीला वेळ असल्याचे सांगून त्यांनी विषय थांबविला. अधिक माहिती महानगराध्यक्ष देऊ शकतील, अशी टिपणीही त्यांनी वेळी केली.
दरम्यान, काँग्रेसने इच्छुकांचे अर्ज १४ जुलैपासून मागविले आहेत़ काँग्रेसकडून इच्छुकांची संख्या जादा असल्याचे सांगितले जात आहे़ त्याच वेळी उत्साहही मागील निवडणुकीपेक्षा कैकपटीने वाढला आहे़
आगामी काळात आघाडी आणि युतीवर चर्चा होईल़ यावेळी आ. अमर राजूरकर, आ. डी.पी. सावंत, जिल्हाध्यक्ष गोविंद पाटील नागेलीकर, माजी जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, वीरेंद्रसिंघ गाडीवाले, शफी अहेमद कुरेशी, संतोष पांडागळे, विजय येवनकर, शाम दरक आदी उपस्थित होते.

Web Title: We are ready for the municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.