ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही; मनोज जरांगे यांचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 12:02 PM2023-10-10T12:02:41+5:302023-10-10T12:03:11+5:30

जीवंत आहे तो पर्यंत समाजाशी गद्दारी  करणार नाही

We do not accept any law which does not have the interest of the Maratha community; Warning of Manoj Jarange | ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही; मनोज जरांगे यांचा इशारा 

ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही; मनोज जरांगे यांचा इशारा 

सिल्लोड: मी इतके निर्दयी सरकार आजपर्यंत पाहिले नाही. ज्यात मराठा समाजाचे हित नाही तो कायदा आम्हाला मान्य नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला. तसेच जीवंत आहे तोपर्यंत मराठा समाजाशी गद्दारी करणार नाही,  समाजावरील अन्याय आता सहन होत नाही. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत लढत राहील, अशी ग्वाही जरांगे पाटील यांनी दिली.

सिल्लोड येथील सभेची वेळ ५ वाजेची होती मात्र जरांगे पाटील जवळपास साडे पाच तास उशिरा आले. मात्र, रात्री १०.३० वाजता देखील उपस्थितांचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. जरांगे पाटील यांचे आगमन होताच त्यांच्यावर जेसीबीवरून पुष्पवृष्टी करण्यात आली. जरांगे पुढे म्हणाले, जातिवंत मराठे आहेत उशीर झाला तरी उत्साह कायम आहे. एकजूट पाहून मी भारावून गेलो आहे. आरक्षण ज्यांना समजले ते रात्रीच आरक्षणात गेले. व्यवसायानुसार देखील आरक्षण मिळाले नाही. आता थांबायचे नाही. एक टक्यामुळे घरात बसलेल्या आई वडिलांना दुःख माहीत आहे. आता हे शेवटचं आंदोलन आहे. सरकारने एक महिन्याची वेळ मागितली हीच मराठ्यांना मोठी संधी आहे. सरकारने दिलेल्या वेळेत आरक्षणाचा निर्णय घ्यावा असा  इशारा त्यांनी दिला.  समिती हैद्राबाद, मुंबई, संभाजीनगर असा नुसता प्रवास करीत आहे. त्यांना ५  हजार पानांचा पुरावा मिळाला आहे यामुळे आता मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले. 

१  जून २००४ रोजी कायदा पारित झालेला आहे त्याचा फक्त सुधारित शासन निर्णया मध्ये दुरुस्ती करा. २०१४ च्या निर्णयाची अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे.मंडळ कमिशनने केवळ १४ टक्के आरक्षण दिले होते मात्र त्याचा ३० टक्के वापर घेतल्या जात आहे. एकजुटीने लढा, आंदोलन शांततेत करा, १४ तारखेला सगळ्यांनी अंतरवली येथील आंदोलनात सहभागी व्हा असे आवाहन केले.

यावेळी डॉ. निलेश मिरकर, डॉ. शेखर दौड, सुनील मिरकर,सुरेश बनकर, उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, राजेंद्र ठोंबरे, मनोज मोरेल्लू, कमलेश कटारिया, इंद्रिस मुलतानी सहित सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी राजकीय विविध पक्षाचे नेते मोठ्या संख्येने हजर होते.

भुजबळांचे नाव न घेता टोला लगावला..
मराठा समाजाने जात न पाहता अनेक नेत्यांना मोठं केलं त्यांचा सन्मान केला आज तेच लोक मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध करताहेत, हे चुकीचं आहे. मराठा आरक्षणाचा विरोध करणाऱ्याचा आम्ही समाचार घेवू. 
 

Web Title: We do not accept any law which does not have the interest of the Maratha community; Warning of Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.