हम लढेंगे, हम जीतेंगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 12:17 AM2017-09-08T00:17:17+5:302017-09-08T00:17:17+5:30
महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत काँग्रेसपुढे कोणतेही आव्हान नसून ‘हम लढेंगे, हम जितेंगे’ अशा शब्दात आगामी महापालिका निवडणुकीतील यशाबाबत खा. अशोकराव चव्हाण यांनी विश्वास व्यक्त केला. नांदेड महापालिका काँग्रेसची आहे आणि काँग्रेसचीच राहील, असेही ते म्हणाले.
काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खा. राहूल गांधी यांच्या दौºयाबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसकडे इच्छुकांची मोठी संख्या आहे. निवडून येण्याची क्षमता आणि पक्षाबाबत असलेली निष्ठा या दोन मुद्यांवर तिकिट वाटपकेले जाईल, असे स्पष्ट करीत काँग्रेस विकासाचा ध्यास असणारा पक्ष आहे. या धोरणाला नांदेडकरांनी नेहमीच पाठिंबा दिल्याचे सांंगत महापालिका निवडणुकीतही नांदेडकर काँग्रेसलाच विजयी करतील, असा विश्वास व्यक्त केला.
महापालिकेच्या दलित वस्तीचा ३० कोटींचा निधी राज्य सरकारने अडवून ठेवला आहे. दलितांच्या विकास योजनांमध्ये आडकाठी आणण्याचे धोरणच या सरकारने अवलंबिले आहे. त्याचाच परिपाक म्हणजे नांदेडमध्ये दलित वस्तीची कामे अडविणे होय. पायाभूत सुविधांसाठी असलेला निधी अडवून ठेवणे ही गंभीर बाब आहे. याबाबत काँग्रेसकडून निश्चितच आवाज उठवला जाणार असून महापालिका निवडणुकीत जनतेपुढे हा विषय ठेवला जाईल, असेही ते म्हणाले.
महापालिका निवडणुकीत तिसºया आघाडीची चर्चा केली जात आहे. ही तिसरी आघाडी भाजपा पुरस्कृत असल्याचा आरोप करीत या आघाडीला जनता स्वत:च त्यांची जागा दाखवून देईल. निवडणुकीत राष्ट्रवादीसह इतर समविचारी पक्षांशी आघाडी करण्यासाठी चर्चेचा मार्ग खुला आहे, यासाठीचे सर्व अधिकार महानगराध्यक्षांना राहतील, असेही त्यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.