हेल्मेट घाला, नाही तर ऑफिसमध्ये ‘नो एंट्री’ !

By संतोष हिरेमठ | Published: June 10, 2023 07:49 PM2023-06-10T19:49:08+5:302023-06-10T19:49:22+5:30

शासकीय, निमशासकीय कार्यालये, महाविद्यालयांमध्येही लवकरच अंमलबजावणी

Wear a helmet, otherwise 'no entry' in the office! | हेल्मेट घाला, नाही तर ऑफिसमध्ये ‘नो एंट्री’ !

हेल्मेट घाला, नाही तर ऑफिसमध्ये ‘नो एंट्री’ !

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : आरटीओ कार्यालयात आता हेल्मेट परिधान केलेल्याच दुचाकीचालकांना प्रवेश दिला जात आहे. शासकीय, निमशासकीय कार्यालये, वरिष्ठ महाविद्यालयांमध्येही लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

आरटीओ कार्यालयात गुरुवारी हेल्मेट नसलेल्या दुचाकीधारकांना प्रवेश नाकारण्यात येत होता. ‘हेल्मेट नसेल तर प्रवेश नाही’ असे फलक प्रवेशद्वारावर लावण्यात आले आहे. आरटीओ कार्यालयापाठोपाठ अन्य शासकीय कार्यालयांतही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. तसेच ३० पेक्षा अधिक आस्थापना असणाऱ्या कार्यालये, कंपन्यांमध्येही याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आरटीओ कार्यालयाकडून प्रत्येकाला सूचना वजा नोटीस दिली जात आहे.

कामगारांची सुरक्षा महत्त्वाची
वाळूज, शेंद्रा परिसरातील कंपन्यांतील कामगारांच्या सुरक्षेसाठी कंपन्यांनीही कंपनीत प्रवेश करताना हेल्मेट सक्ती करणे आवश्यक आहे. अपघातातील अनेक दुचाकीस्वार हे कंपन्यांतील कामगार असल्याचे समोर येते, असे प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे म्हणाले.

नंतर कारवाईचा बडगा
या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी मुदत दिली जाणार आहे. या मुदतीनंतर आरटीओ कार्यालयाच्या पथकाकडून कार्यालयात हेल्मेटशिवाय प्रवेश करणाऱ्या दुचाकीचालकांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

Web Title: Wear a helmet, otherwise 'no entry' in the office!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.