वजनकाटा सोडविण्यासाठी १० हजाराची लाच घेणारा वजनमापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 07:20 PM2022-09-05T19:20:33+5:302022-09-05T19:20:48+5:30
कन्नड ( औरंगाबाद ) : १० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शहरातील वजनमापे निरीक्षक अलगद अडकला आहे. ...
कन्नड (औरंगाबाद) : १० हजाराची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात शहरातील वजनमापे निरीक्षक अलगद अडकला आहे. ज्ञानेश्वर किसनराव तांदळे असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांची गॅस एजन्सी आहे. गॅस एजन्सीमधील इलेक्ट्रॉनिक्स वजन काटा वजनमापे विभागाने ताब्यात घेतला होता. तो सोडविण्यासाठी वजनमापे निरीक्षक ज्ञानेश्वर किसनराव तांदळेने ( ४९ ) १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. ज्ञानेश्वर तांदळे यांनी फिर्यादीकडून लाच स्विकारतांना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ राहुल खाडे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उप अधीक्षक दिलीप साबळे,मारूती पंडित यांच्या मार्ग दर्शना खाली पो.ना. भिमराज जिवडे, दिगंबर पाठक, चालक पोलिस अंमलदार चंद्रकांत शिंदे यांनी केली.