छोट्या पंढरपुरात दिंडीचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:55 PM2019-06-25T22:55:09+5:302019-06-25T22:55:15+5:30
आषाढी यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या दिंडीचे मंगळवारी सकाळी छोट्या पंढरपुरात भाविकांनी स्वागत केले.
वाळूज महानगर: आषाढी यात्रेसाठी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पायी जाणाऱ्या दिंडीचे मंगळवारी सकाळी छोट्या पंढरपुरात भाविकांनी स्वागत केले.
धुळे जिल्ह्यातील श्री सिद्धेश्वर महादेव संस्थान क्षेत्र बुरझड येथून ह.भ.प. अशोक महाराज लामकानीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री क्षेत्र पंढरपूर पायी दिंडी काढण्यात आली आहे. बुरझड येथून पंढरपूरकडे निघालेल्या वारकरी दिंडीचे मंगळवारी १० वाजता छोट्या पंढरपुरात आगमन झाले.
आगमन होताच दिंडीचे भाविकांनी स्वागत केले. येथील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरात दिंडीतील वारकऱ्यांचा मुक्काम रहाणार असून येथेच त्यांची जेवणाची सोय करण्यात आली आहे. बुधवारी सकाळी वाळूज मार्गे श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने दिंडी मार्गक्रमण करणार आहे.