नदीपात्रात अतिक्रमण करून खोदली विहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:02 AM2021-06-18T04:02:06+5:302021-06-18T04:02:06+5:30
खुलताबाद : तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील एका जणाने गिरिजा नदीपात्रातच अतिक्रमण करून विहीर खोदली आहे. यासह विहिरीतून निघालेल्या ...
खुलताबाद : तालुक्यातील देवळाणा बुद्रुक येथील एका जणाने गिरिजा नदीपात्रातच अतिक्रमण करून विहीर खोदली आहे. यासह विहिरीतून निघालेल्या डब्बरनेच नदीचे पात्र अरुंद केल्याने या भागातील शेतकऱ्यांना अनेक अडचणी येत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी महसूल विभागाकडे तक्रार करूनसुद्धा संबंधितावर कुठलीच कारवाई करत नसल्याचे पुढे येत आहे.
देवळाणा बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील गिरिजा नदीपात्रात (गट क्रमांक १७९) अकबर वजीर पटेल यांनी चक्क विहीर खोदत नदीत अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. नदीपात्र अरुंद झाल्याने मुसळधार पावसामुळे जाधव वस्तीकडे जाणारा छोटा रस्ता वाहून जाण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांनी खुलताबाद तहसीलदार, पोलीस स्टेशन, देवळाणा ग्रामपंचायत, पोलीस पाटलांकडे लेखी तक्रार करूनही आजपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही.
या भागातील जाधव वस्तीवर जवळपास २५ ते ३० शेतकरी कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यांच्या शेतीला खते, बियाणे, शेतमाल वाहतुकीला दुसरा पर्यायी रस्ता नसल्यामुळे शेतकऱ्यांची या विहिरीमुळे गैरसोय झाली आहे. त्यामुळे नदीवरील अतिक्रमण तात्काळ हटविण्याची मागणी अरुणा जाधव, किसन जाधव, शेषराव जाधव, सर्जेराव जाधव, संदीप जाधव, विनोद जाधव, अमिता जाधव, योगेश जाधव, संतोष हिवर्डे, गणेश जाधव, शारदाबाई कोतकर आदींनी केली आहे.
-- फोटो कॅप्शन :
देवळाणा येथील गिरिजा नदीपात्रात विहीर खोदून असे अतिक्रमण करण्यात आले आहे.
170621\17_2_abd_21_17062021_1.jpg
-- फोटो कँप्शन : देवळाणा येथील गिरिजा नदीच्या पात्रात विहिर खोदून असे अतिक्रमण करण्यात आले आहे.