छापा टाकण्यासाठी गेले अन् पंच न मिळाल्याने ताटकळून बसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:04 AM2021-03-28T04:04:52+5:302021-03-28T04:04:52+5:30

वैजापूर : अवैध दारू व गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक धोंदलगाव येथे छापा टाकण्यासाठी ...

Went to raid and sat down as he did not get any punch | छापा टाकण्यासाठी गेले अन् पंच न मिळाल्याने ताटकळून बसले

छापा टाकण्यासाठी गेले अन् पंच न मिळाल्याने ताटकळून बसले

googlenewsNext

वैजापूर : अवैध दारू व गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्याचे पथक धोंदलगाव येथे छापा टाकण्यासाठी गेले. आरोपीने पोलिसांना पाहताच दुकान बंद करून पोबारा केला. दुकानाचे कुलूप तोडण्यासाठी पोलिसांना पंच हवे होते. मात्र, आरोपीची प्रचंड दहशत असल्याने एकही नागरिक पंच बनण्यास तयार होईना, तेव्हा हतबल झालेल्या पोलिसांना तब्बल चार तास ताटकळत बसावे लागले. शेवटी आरोपीची पत्नी आल्यानंतर कारवाई करीत देशी, विदेशी दारूसह गुटखा जप्त केला. तसेच नंतर आरोपीलाही अटक केली.

खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपूत, फौजदार रमेश जाधवर, विजय जाधव, सहायक फौजदार रज्जाक शेख, जालिंदर तमनर, कापसे, पवार, पठारे यांच्या पथकाने धोंदलगाव येथील माऊली किराणा दुकानात शनिवारी दुपारी २ वाजता छापा टाकला. पोलिसांना दुरून पाहताच दुकान मालक ज्ञानेश्वर रखमाजी आवारे याने दुकानाला कुलूप लावून पोबारा केला. दुकानाची झडती घेण्यासाठी कुलूप तोडणे आवश्यक होते. तेव्हा पोलिसांनी गावातील नागरिकांना पंच होण्याचे आवाहन केले. मात्र, आवारे याची गावात प्रचंड दहशत असल्याने कोणीही पोलिसांसाठी पंच होण्याची हिंमत केली नाही. पोलिसांनी ऐनकेनप्रकारेण अनेकांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीही फायदा झाला नाही. दोन वाजता गेलेल्या पोलिसांना यामुळे सहा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. शेवटी आरोपीची पत्नी आल्यानंतर तिच्या उपस्थितीत दुकान उघडण्यात आले व पोलिसांनी कारवाई करून दुकानातील देशी-विदेशी दारू व गुटखा, असा एकूण ५४ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यानंतर पोलिसांनी आरोपी आवारे याच्याही मुसक्या आवळल्या. याप्रकरणी हवालदार दिलीप वेलगुडे यांच्या फिर्यादीवरून ज्ञानेश्वर रखमाजी आवारे याच्या विरुद्ध वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट

खूनप्रकरणी सजा भोगून आलेला आरोपी

धोंदलगाव येथील ज्ञानेश्वर आवारे हा खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी होता. एक वर्षापूर्वीच तो सजा भोगून गावी परतला होता. तेव्हापासून त्याने दुकानात अवैध प्रकारे दारू व गुटखा विक्री सुरू केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आवारे याची गावात प्रचंड दहशत असून, नागरिक त्याला घाबरतात. यामुळे बिनधास्तपणे तो अवैध प्रकारे देशी, विदेशी दारूसह गुटखा विक्री करीत होता.

फोटो कॅप्शन : धोंदलगाव येथे किराणा दुकानावर छापा टाकून पोलिसांनी पकडलेला देशी-विदेशी दारू व गुटख्याचा साठा.

270321\img-20210327-wa0146_1.jpg

धोंदलगाव येथे किराणा दुकान मध्ये छापा मारून पोलिसांनी पकडलेला देशी, विदेशी दारू व गुटख्याचा साठा.

Web Title: Went to raid and sat down as he did not get any punch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.