वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे काय?

By Admin | Published: May 16, 2014 12:25 AM2014-05-16T00:25:23+5:302014-05-16T00:40:40+5:30

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या यथोचित स्मारकाचे काय झाले? असा सवाल आज येथे उपस्थित करण्यात आला.

What about the monument of Vamanadada Kardak? | वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे काय?

वामनदादा कर्डक यांच्या स्मारकाचे काय?

googlenewsNext

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहरात महाकवी वामनदादा कर्डक यांच्या यथोचित स्मारकाचे काय झाले? असा सवाल आज येथे वामनदादा कर्डक यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अभिवादनाच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित करण्यात आला. विपश्यना बुद्धविहारात सकाळी दशरथ बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली हा अभिवादनाचा कार्यक्रम झाला. वामनदादांचे मानसपुत्र व प्रसिद्ध गायक गौतमकुमार जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. वामनदादा कर्डक यांचे निधन होऊन आज दहा वर्षे झाली. वामनदादांचे औरंगाबादवर खूप प्रेम होते. औरंगाबादेत त्यांचा शिष्यवर्गही मोठा आहे. येथील मनपाने वामनदादांच्या पुतळ्याचा ठरावही संमत केला; परंतु या पुतळ्याचा पत्ता नाही. या कामाच्या झारीतले शुक्राचार्य दुसरे- तिसरे कुणी नाहीत, याकडे यावेळी स्वत: गौतमकुमार जाधव यांनी लक्ष वेधले व पुतळा होईपर्यंत संघर्ष चालूच ठेवण्यात येईल, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. बुद्धप्रिय कबीर यांनी वामनदादांची गाणी गाणार्‍या गायकांना गुन्हेगार ठरविण्याच्या प्रवृत्तीचा यावेळी निषेध केला. रतनकुमार भालेराव यांनी वामनदादांच्या समवेत आपण वाद्यांची साथसंगत कशी करीत होतो याविषयीच्या आठवणी सांगितल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वामनदादांना मरणोत्तर डी.लिट. पदवी द्यावी, वामनदादांच्या नावाने विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्यात यावे, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या व त्यासाठी पुन्हा नव्याने पाठपुरावा करण्याचे ठरले. यावेळी अर्जुन मगरे, कडुबा तुपे, अमोल जाधव, गणेश लोखंडे, अनिल काळे, संदीप अहिरे, रवीभाई तायडे, अ‍ॅड. बी.एन. जाधव, अशोक खरात, गोकुळ भुजबळ, अ‍ॅड. संतोष लोखंडे, डॉ. नागसेन दवणे, विजय बचके, विजय खोतकर, नाथा वखरे, जयपाल दवणे, शंकर तीनगोटे, जी.एन. खंडाळे, संदीपान कांबळे, अण्णासाहेब पठारे, प्रभू बनकर, विनोद साबळे, सुशील भालेराव व महिला मंडळाची उपस्थिती होती. रमानगरात... रमानगर येथील कवी सिद्धार्थ जाधव यांच्या निवासस्थानी वामनदादा कर्डक यांना अभिवादन करण्यात आले. महाकवी वामनदादा कर्डक प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात गायक संभाजी गायकवाड यांनी गायिलेल्या गीताने झाली. प्रास्ताविक सिद्धार्थ जाधव यांनी केले. ढोलकीपटू सुरडकर गुरुजींचे अलीकडेच निधन झाले. त्यांनी वामनदादांना ढोलकीची साथ दिली होती. वामनदादांबरोबर साथसंगत करणारे कलावंत आता हळूहळू संपुष्टात येत आहेत. जे हयात आहेत, त्यांच्या आठवणींचे एखादे पुस्तक काढावे, असा मतप्रवाह यावेळी आढळून आला. मधुकर भोळे व बुद्धप्रिय कबीर यांची यावेळी भाषणे झाली. वीर कडेठाणकर गुरुजी, शाहीर सखाराम साळवे, बाबूराव जुंबडे आदींची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: What about the monument of Vamanadada Kardak?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.