कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ? २,२९७ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:04 AM2021-06-30T04:04:47+5:302021-06-30T04:04:47+5:30

औरंगाबाद : साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात ...

What is Article 188? Crimes registered against 2,297 persons | कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ? २,२९७ जणांवर गुन्हे दाखल

कलम १८८ म्हणजे काय रे भाऊ? २,२९७ जणांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

औरंगाबाद : साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ मधील तरतुदीनुसार दिलेल्या आदेशांची पायमल्ली करणाऱ्यांविरुद्ध कलम १८८ अन्वये अदखलपात्र गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सध्या कोविड-१९ ही जागतिक महामारी सुरू आहे. ती नियंत्रणात आणण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाच डेल्टा प्लसने डोके वर काढले आहे. त्यामुळे महाराष्ट्रभर कडक निर्बंध पुन्हा लावावे लागत आहेत.

..................

जिल्ह्यात दाखल गुन्हे - २ हजार २९६

जप्त करण्यात आलेली वाहने - ८५८

आकारण्यात आलेला दंड - १३ लाख १८ हजार ९५० रु.

.....................

काय आहे कलम....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी कलम १८८ लागू करण्यात आले. या कलमान्वये पाचपेक्षा अधिक लोकांना गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे. लॉकडाऊनसाठी घोषित केलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यावर या कलमान्वये संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

............................

दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा....

नियमांचे उल्लंघन केल्यास एक महिना तुरुंगवास किंवा दोनशे रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते. तसेच मानवी जीवन, स्वास्थ्य व सुरक्षिततेस धोका निर्माण केला असेल तर अशा व्यक्तीस किमान सहा महिने तुरुंगवास किंवा एक हजार रुपये दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, अशी माहिती विविध विधिज्ञांनी दिली.

...................

नियमांचे काटेकोर पालन करणे हाच उत्तम उपाय...

कोरोना काळ अजूनही संपलेला नाही. प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी तिसऱ्या लाटेची टांगती तलवार आहेच. शिवाय म्युकरमायकोसिस, डेल्टा, डेल्टा प्लस यांसारखे साईड इफेक्ट्स वाढलेले आहेत. अशावेळी शासनाने घालून‌ दिलेल्या नियमांचे पालन करणे हाच उत्तम मार्ग होय. सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे यात हलगर्जीपणा मुळीच नको.

- रवींद्र साळोखे, एसीपी, सायबर क्राइम.

डमी ८६५

Web Title: What is Article 188? Crimes registered against 2,297 persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.