काय सांगता? धुरामुळेही होते विषबाधा; गंभीर रुग्णाच्या तपासणीतून डॉक्टरांनी केला उलगडा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:55 AM2023-05-29T11:55:58+5:302023-05-29T12:06:28+5:30

गंभीर रुग्णाच्या पत्नी आणि मुलालाही लक्षणे दिसत होती; तपासणीतून झाले निदान

what do you say Smoke also causes poisoning; The doctor found out from the examination of the serious patient | काय सांगता? धुरामुळेही होते विषबाधा; गंभीर रुग्णाच्या तपासणीतून डॉक्टरांनी केला उलगडा

काय सांगता? धुरामुळेही होते विषबाधा; गंभीर रुग्णाच्या तपासणीतून डॉक्टरांनी केला उलगडा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : एक रुग्ण गंभीर अवस्थेत आला होता. त्याला विषबाधेसारखी लक्षणे होती. खूप प्रयत्न करूनही निदान होत नव्हते. त्याच्या पत्नी आणि मुलालाही काहीशी तशीच लक्षणे होती. विचारपूस केल्यानंतर चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी ते ज्या झाडांची लाकडे वापर होती, त्या लाकड्याच्या धुरामुळे हा परिणाम होत असल्याचे निदान झाले, असे कोइंबतूर येथील डाॅ. एस. सेंथिल कुमारन म्हणाले.

राज्यस्तरीय फिजिशियन संघटनेच्या सहकार्यातून आयोजित ‘मराठवाडा रिजनल फिजिशियन्स कॉन्फरन्स’ (मार्फिकॉन) या फिजिशियन डॉक्टरांच्या परिषदेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी ‘इमर्जन्सी मेडिसिन’ याविषयी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी डाॅ. एस. सेंथिल कुमारन यांनी डाॅक्टरांनी कधीच न ऐकलेल्या , कल्पना केली नसलेल्या अत्यवस्थ रुग्णामध्ये काय काय मुद्दे असू शकतात आणि कसे ते दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते हे सांगितले.

परिषदेत डॉ. रमेश सातारकर यांनी ‘सिरोसिस’ या गंभीर विकाराच्या उपचार पद्धतीतील आव्हाने व आयुर्मान वाढवण्यासाठीच्या व्यूहरचनेबाबत, डॉ. अजित भागवत यांनी ‘कन्जेस्टिव्ह हार्ट फेल्युअर’संदर्भातील उपचार पद्धती व व्यवस्थापनावर, डॉ. अविनाश बुचे यांचे ‘ऱ्हुमटॉइड अर्थ्रायटिस’मधील नवीन औषधोपचार व उपचार पद्धती, डॉ. संजय पाटणे यांनी ‘हेवी मेटल टॉक्सिसिटी’ म्हणजेच धातूंमधून होणारी विषबाधा, डॉ. श्रीगणेश बर्नेला यांनी मूत्रपिंड विकारांसंबंधी, तर मधुमेहासंबंधी एंडो क्रायनोलॉजिस्ट डॉ. हेमंत फटाले व डॉ. अर्चना सारडा यांनी मार्गदर्शन केले. शहरात सुमारे १५ वर्षांनंतर झालेल्या फिजिशियन्स डाॅक्टरांच्या परिषदेसाठी डॉ. सुरेंद्र जयस्वाल, छत्रपती संभाजीनगर फिजिशियन्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय पाटणे, शहर सचिव डॉ. अनंत कुलकर्णी, कॉन्फरन्सचे सायंटिफिक चेअरमन डॉ. योगेश लक्कास आदींनी प्रयत्न केले.

मधुमेह आणि हृदयरोग जपा
डॉ. नारायण देगावकर यांनी मधुमेह आणि हृदयरोग याविषयी मार्गदर्शन केले. मधुमेहामुळे हृदयरोगाला आमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवला पाहिजे, असे तज्ज्ञांनी म्हटले.

Web Title: what do you say Smoke also causes poisoning; The doctor found out from the examination of the serious patient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.