नेमके करावे तरी काय; औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उताराने आरोग्य यंत्रणाही त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2020 12:38 PM2020-09-14T12:38:16+5:302020-09-14T12:41:51+5:30

गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे.

What exactly to do; In Aurangabad city, the health system is also suffering due to fluctuations in the number of corona patients | नेमके करावे तरी काय; औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उताराने आरोग्य यंत्रणाही त्रस्त

नेमके करावे तरी काय; औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्येत चढ-उताराने आरोग्य यंत्रणाही त्रस्त

googlenewsNext
ठळक मुद्दे नागरिक नियम पाळायला तयार नाहीत पॉझिटिव्ह रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य विभागाच्या चिंतेत भर

औरंगाबाद : कोरोना रुग्णांची संख्या आज झपाट्याने वाढलेली असते, तर दुसऱ्या दिवशी संख्या अत्यंत कमी झालेली असते. रुग्णसंख्येतील या चढ-उतारामुळे आरोग्य यंत्रणा त्रस्त झाली आहे. रुग्णसंख्या आटोक्यात तरी कशी आणावी, असा प्रश्न यंत्रणेला पडला आहे. मागील पंधरा दिवसांत रुग्णसंख्येत वाढ होताना दिसून येत असल्यामुळे चिंता अधिक वाढू लागली आहे. 

महापालिका हद्दीत सध्या ३ हजार ९४३ म्हणजे जवळपास चार हजार रुग्णांवर उपचार सुरू आहेत. लक्षणे नसलेल्या रुग्णांवर उपचार करणे सोपे जात आहे. गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. शनिवारी दिवसभरात २३२ रुग्ण दाखल झाले, तर १४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढू लागल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाची चिंतेत भर पडत आहे. मागील पंधरा दिवसांच्या रुग्णसंख्येवर नजर फिरवली असता कमालीचा चढ-उतार दिसून येत आहे.

जिल्ह्यात खाटा संनियंत्रणासाठी कक्ष
01. जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी शासकीय तसेच खाजगी रुग्णालयात खाटा उपलब्ध करणे व त्याचे संनियंत्रण करणे, रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशान्वये काही अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
02. यामध्ये उपायुक्त पशुसंवर्धन प्रशांत चौधरी, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी सुरेखा माने, सहायक विक्रीकर आयुक्त गजानन जोशी, जिल्हा महिला व बाल कल्याण अधिकारी हर्षा देशमुख, सहायक आयुक्त विक्रीकर योगेश नेतनकर, गोपालकृष्ण यादव, मकरंद कंकाल, धनंजय कोळी, संदीप शेजूळ, नितीन भोसले यांचा समावेश आहे. 
03. कोरोना प्रतिबंध, उपचार व रुग्णालयातील खाटांच्या व्यवस्थापनाबाबत २४ तास मनपा मुख्यालयातील हा नियंत्रण कक्ष कार्यरत असेल. सदर कक्ष नागरिक, रुग्णांचे नातवाईक, कुटुंबीय, नातेवाईक यांच्याकरिता शासकीय व खाजगी रुग्णालयात कोरोना उपचारासंबंधी वैद्यकीय खाटांची उपलब्धता व वाटप इतर पूरक सुविधांसंबंधी मदतीकरिता स्थापन करण्यात आला आहे. अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे हे संनियंत्रण अधिकारी म्हणून, तर वैद्यकीय अधिकारी प्रेरणा संकलेचा, डॉ. नीता पाडळकर या समन्वय अधिकारी असतील. 

नागरिकांनी नियम पाळावेत
शहरात कोरोना नाही अशा पद्धतीने अनेक नागरिक वावरत आहेत. शहरासाठी ही अत्यंत धोक्याची बाब असून, नागरिकांनी सोशल डिस्टन्स आणि मास्कचा वापर केलाच पाहिजे. या दोन गोष्टी १०० टक्के पाळल्या गेल्या, तर संसर्ग काही प्रमाणात कमी होईल. पूर्वीच्या पद्धतीने रुग्ण शोधणे आणि तपासण्या करणे हे काम महापालिकेकडून नियमितपणे सुरू आहे. रुग्णसंख्येत कमी-जास्त वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. 
- नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.


रुग्णसंख्येतील                 चढता-उतरता आलेख
तारीख     रुग्णसंख्या
२७ आॅगस्ट     २६०
२८ आॅगस्ट     २७७
२९ आॅगस्ट     २४२
३० आॅगस्ट    १८४
०१ सप्टेंबर     १७८
०२ सप्टेंबर     २६६
०३ सप्टेंबर     २५१
०४ सप्टेंबर     ३३४
०५ सप्टेंबर    २२८
०७ सप्टेंबर    ३१३
०८ सप्टेंबर    २६१
१० सप्टेंबर    २७०
११ सप्टेंबर     २९३
१२ सप्टेंबर    २३२ 

Web Title: What exactly to do; In Aurangabad city, the health system is also suffering due to fluctuations in the number of corona patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.