मोबाईल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:04 AM2021-06-06T04:04:51+5:302021-06-06T04:04:51+5:30
औरंगाबाद : हवेत गप्पा करणाऱ्यांच्या शरीरातील आवसानच काढून टाकले असून, मोबाईल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको ! ...
औरंगाबाद : हवेत गप्पा करणाऱ्यांच्या शरीरातील आवसानच काढून टाकले असून, मोबाईल बिघडला म्हणून काय झाले; आरोग्य बिघडायला नको ! म्हणून कोरोनामुळे नवीन मोबाईल घेण्यापेक्षा दुरुस्तीवरच जास्त भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे.
दीड महिन्यापासून मोबाईल विक्रीे तथा दुरुस्तीची दुकाने शटडाऊन होती. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचे संक्रमण अधिक असल्याने लॉकडाऊनमध्ये ही दुकाने बंदच ठेवली होती. ज्यांनी दुकाने उघडण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आल्याने बहुतांश व्यावसायिकांना अडचणीतून जावे लागले. तर मोबाईल एक महत्त्वाचे संपर्काचे साधन बनले असले तरी ते बंद पडणाऱ्यांना काहीतरी हरवल्याचा सतत भास होताना जाणवला. रुग्णसंख्या कमी झाली आणि दुकाने अटी, नियमांनुसार काही तासांसाठी खुली ठेवण्याचा शासनाने निर्णय घेतला तेव्हा धूळखात पडलेले मोबाईल संच दुकानावर दुरुस्तीसाठी पाठविण्यात आले. त्यामुळे दुकानावर गर्दी होताना दिसली. दुकानात मास्क आणि सॅनिटायझरचा वापर केल्याशिवाय सेवा पुरवू नये, असाही दम शासनाने दिल्याने खबरदारी घेण्यावर दुकानदारांनी भर दिलेला आहे.
काय कारण....
- मोबाईलची काच तडकली
- आवाज येत नाही स्पीकर्स ऑन करावा लागतो
- मोबाईल हँग होण्याचे प्रकार वाढल्याने संपर्क होत नाही
-बॅटरी खराब झाली आहे
-मोबाईलची बॉडी बदलायची आहे
- हेड फोन घ्यायचा आहे
- सुरक्षेसाठी मोबाईल कव्हर घ्यायचे आहे
---------------
- मोबाईल महत्त्वाचाच, पण आरोग्य?
- मोबाईलमुळे दूरच्या नातेवाईकांना काही सेेकंदात सुखदु:खाचा संदेश दिला जातो. मोबाईल खराब झाल्याने संपर्क तुटल्यासारखेच वाटते. कोरोनामुळे आरोग्यही जपणे महत्त्वाचे आहे.
- शैलेश भालेराव (प्रतिक्रिया)
- राज्यात निर्बंध शिथिल झाले असले तरी कोरोना संपुष्टात आला असे नाही. स्वत:ची काळजी स्वत:लाच करावी लागणार आहे. स्मार्ट फोनच्या किरकोळ दुरुस्तीसाठी दीड महिन्याची वाट पहावी लागली.
- सुनील साळवे (प्रतिक्रिया)
------------------
दीड महिन्यापासून बाजार बंद...
बाजार बंद असल्याने घरपोच सेवा देणाऱ्या मेकॅनिकसाठी कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले. अनेकदा हातात काम असतांना मोबाईलचे पार्ट शोधताना होणारी गैरसोय कोरोनामुळे जीव कासावीस करणारीच ठरत होती.
- नवीन मोबाईल घेण्याकडे अधिक कल दिसला नाही, फक्त विचारणा करणारे फोन येत होते. मोबाईल विक्री करण्यासाठी दुकान उघडण्याची परवानगीच नव्हती. कमाई रुपया आणि खर्च बारा आणे अशी अवस्था दुकानदार व ग्राहकांची झाली होती. त्यामुळे कुणीही जोखीम पत्करायला तयार नव्हते.
- -------
दीड महिन्यानंतर शटर उघडले....
- कोरोनामुळे दुकाने बंद झाली. ग्राहकीच नाही अर्थिक सोर्स थांबला. बँकाचे हप्ते थकले. त्यांचे व्याजदेखील भरावे लागणार आहे. बरे झाले दुकाने उघडली. तडजोड करता येणार आहे.
- गौतम काकडे (दुकानदार)
- जवळपास दोन महिने दुकाने बंद राहिली. परंतु शॉप मालक, बँक, मालाची उधारी वसुलीचा तगादा सुरू होता. दुकानात काम करणाऱ्यांचे पगार देणे भाग पडले. यासाठी पुन्हा आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागले. शटर उघडल्याने थोडा जीवात जीव आला.
- राजेश वासवाणी (दुकानदार )
(डमी स्टार ७८०) (फोटो )