पॅरोल आणि फर्लो रजा म्हणजे काय साहेब ? काय कारण असेल तर कारागृहातून मिळते रजा?

By सुमित डोळे | Published: September 6, 2023 08:08 PM2023-09-06T20:08:09+5:302023-09-06T20:08:47+5:30

या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही. बंदी जितके दिवस रजेवर राहतो, तेवढे शिक्षेचे दिवस वाढतात.

What is parole and furlough leave? What is the reason for getting leave from prison? | पॅरोल आणि फर्लो रजा म्हणजे काय साहेब ? काय कारण असेल तर कारागृहातून मिळते रजा?

पॅरोल आणि फर्लो रजा म्हणजे काय साहेब ? काय कारण असेल तर कारागृहातून मिळते रजा?

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : कारागृहात एकदा गेले की बाहेर येणे मुश्कीलच, असे सर्वसामान्यपणे म्हटले जाते. म्हणजेच, दखलपात्र गुन्ह्यात एकदा का कारागृहाचा ससेमिरा मागे लागला की अर्धे अधिक आयुष्य कारागृहात खिचपत पडून राहावे लागते; परंतु शिक्षेदरम्यानही बंद्यांना काराबाहेर बाहेर रजेवर येण्याची मुभा असते. शिक्षा भोगताना बंद्यांना अभिवचन रजा म्हणजेच पॅरोल व दुसरी संचित म्हणजे फर्लो रजेसाठी विनंती करण्याचा अधिकार असतो. या दोन्ही रजा केवळ पक्का बंदी म्हणजेच गुन्हा सिद्ध होऊन शिक्षा लागलेल्या बंद्यांना लागू असतात; परंतु अनेकदा रजा मिळताच बंदी पसार होऊन जाण्याचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे.

रजा कधी व कशी मिळते ?
कारागृह प्रशासन बंद्याचा अर्ज विभागीय आयुक्तांकडे पाठवतात. अर्जाचे गांभीर्य पाहून संबंधित बंदी जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या गुन्हे शाखेकडे अभिप्रायासाठी पाठवला जातो. तेथे अर्जातल्या कारणाची शहानिशा केली जाते.
-संचित रजेचा १५, तर पॅरोल रजेचा कालावधी १ महिन्याचा असतो. विनंतीवरून पॅरोल तीन महिन्यांपर्यंत वाढवता येते.
-जवळचे नातेवाईक मृत झाल्यास दहा दिवसांची पॅरोल कारागृह अधीक्षक मंजूर करू शकतात. या रजेचा कालावधी शिक्षेत गणला जात नाही. बंदी जितके दिवस रजेवर राहतो, तेवढे शिक्षेचे दिवस वाढतात. यादरम्यान त्याने गुन्हे केल्यास परत कोणतीच रजा मिळत नाही.

रजा मिळाली; पण परतलेच नाही
हर्सूल मध्यवर्ती कारागृहात राज्यातील विविध शहर, जिल्हा मिळून १४ विभागातील बंदी शिक्षा भोगतात. यापैकी कोरोना काळात रजा घेऊन जवळपास ७३ तर संचित, पॅरोल मिळून ६१ बंदी परतलेच नसल्याचे राज्य कारागृह विभागाच्या माहितीतून समोर आले आहे. कारागृह प्रशासनाकडून पत्रव्यवहार केल्यानंतर स्थानिक पोलिस त्यांचा शोध घेते.

हर्सूल मध्यवर्ती कारागृहाची क्षमता
१ हजार २१४, प्रत्यक्षात १ हजार ५७६
प्रकार             पुरुष             स्त्री
अधिकृत क्षमता १ हजार १५३ ६१
प्रत्यक्ष बंदी १ हजार ५१४ ६२

कोरोना काळात रजेवरून पसार झालेले बंदी
विभाग - पसार बंदी
छत्रपती संभाजीनगर ग्रामीण - १९
छत्रपती संभाजीनगर शहर - ७
परभणी - ५
जालना - २
लातूर - १०
हिंगोली - ३
बीड - १०
उस्मानाबाद - २
अहमदनगर - ४
नांदेड - १५
पुणे - १
वाशिम - १
धुळे - १
नाशिक - २
तेलंगणा - १
कर्नाटक - १
उत्तर प्रदेश - २

इतर रजेवयन पसार
संचित - २८
पॅरॉल - ३३

Web Title: What is parole and furlough leave? What is the reason for getting leave from prison?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.