संग्रामनगर येथील वाहतूककोंडीवर काय तोडगा? खंडोबा यात्रेसाठी मंदिरापर्यंत जायचे कसे?
By साहेबराव हिवराळे | Updated: December 18, 2023 12:35 IST2023-12-18T12:35:32+5:302023-12-18T12:35:49+5:30
सोमवारी चंपाषष्ठी; भाविकांची गर्दी! वाहतूक कशी ओलांडायची भाविकांना चिंता

संग्रामनगर येथील वाहतूककोंडीवर काय तोडगा? खंडोबा यात्रेसाठी मंदिरापर्यंत जायचे कसे?
छत्रपती संभाजीनगर : सातारा येथे सोमवारी चंपाषष्ठी खंडोबा यात्रा आहे. संग्रामनगर पूल, शहानुरमिया दरगाह रस्त्याकडे भक्तांची गर्दी यावेळी अधिक असेल. यामुळे होणारी वाहतूककोंडी कशी ओलांडायची, अशी चिंता भाविकांना आहे.
चंपाषष्ठीला शिवाजीनगर, संग्रामनगर, एमआयटी उस्मानपुरा चौकी आणि रेल्वे स्टेशन पैठण रोड इत्यादी परिसरातून वाहनांची वर्दळ सुरू असते. परंतु, शिवाजीनगर मार्ग बंद असल्याने व एमआयटी-उस्मानपुरा रस्त्याचेही काम प्रगतिपथावर असल्याने संग्रामनगर पुलाखालीच अधिक गर्दी उसळणार आहे. या ठिकाणचा सर्विस रोडचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे अपघाताची भीती आहे.
रखडलेल्या सर्विस रोडचा प्रश्न सोडवा...
एकेरी वाहतूक असल्याने वाहने एकाच मार्गावर असतात. त्यांना मंदिराकडे जाणे अथवा साताऱ्यात जाणे अधिक धोकादायक आहे. या ठिकाणी वाहनांना सुरळीत मार्ग तुम्ही कसा काढून देणार, असा प्रश्न अनुत्तरित आहेे. त्याकडे लक्ष देऊन सामान्य जनतेची कोंडी थांबवावी. - रमेश बाहुले
अतिक्रमण होण्याची भीती..
जे सर्विस रोड मोकळे केलेले आहेत त्याकडे लक्ष न दिल्यास पुढे अतिक्रमण होऊन पुन्हा मनपाला मोहीम राबवावी लागेल. - सोमीनाथ शिराणे
भाविकांची गैरसोय टाळावी..
इतर रस्ते बंद असल्याने भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सुरक्षितपणे जाता यावे, यासाठी पोलिस प्रशासनानेही संग्रामनगर पुलाखाली होणारी वाहतूक बारकाईने लक्ष ठेवून सुरळीत करण्याची गरज आहे. - अजय चोपडे