बिल वेळेत भरूनही लाइट जात असेल तर काय करायचे साहेब?
By साहेबराव हिवराळे | Published: September 8, 2023 06:58 PM2023-09-08T18:58:29+5:302023-09-08T19:00:02+5:30
मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे.
छत्रपती संभाजीनगर : पावसाने पाठ फिरवल्याने विजेची मागणी वाढली आहे. त्यामुळे भारनियमन वाढले आहे. पावसाने ओढ दिल्याने राज्यात वाढलेल्या विजेच्या मागणीचा व उपलब्धतेचा समतोल राखण्यासाठी महावितरणला काही ठिकाणी नाइलाजास्तव आकस्मिक भारनियमन करावे लागत आहे. मात्र हे भारनियमन तात्पुरते आहे.
मागणीएवढी वीज उपलब्ध करण्यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करीत आहे. दोन दिवसांपासून पाऊस पडल्याने दिवसभर भारनियमन झालेले नाही. ही परिस्थिती अशीच राहावी, अशी इच्छा विनाकारण उकाडा सहन करणाऱ्यांतून व्यक्त होत आहे.
जिल्ह्यात विजेची मागणी किती?
राज्यात शुक्रवारी सकाळी विजेची शिखर मागणी २४ हजार ३०० मेगावॅट होती. जवळपास ८०० ते ९०० मेगावॅटचे सकाळी ६ ते ७.३० या काळात चक्राकार पद्धतीने जी १, जी २ व जी ३ या गटात भारनियमन करण्यात आले.
उपलब्ध वीज किती?
४ हजार ३०० मेगावॅट होती. त्यात ९०० मेगावॅटचे चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागत आहे. पाऊस नसल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.
शहरात एक तास, ग्रामीण भागात चार तासांपर्यंत भारनियमन
घरगुती, वाणिज्यिक, कृषी, औद्योगिक व इतर सर्व वीज ग्राहकांनी विशेषतः सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री १० या कमाल मागणीच्या कालावधीत विजेचे भारनियमन तर शहरात सकाळी ६ ते ७.३० या काळात चक्राकार पद्धतीने जी १, जी २ व जी ३ या गटात भारनियमन करण्यात आले.
वीजगळती जास्त, तिथे भारनियमन जास्त
भारनियमनाचीही वर्गवारी केली असून, सी कॅटेगिरीतील नागरिकांना अधिक फटका बसत आहे.
बिल भरूनही त्रास का?
नियमित वीज बिल अदा करणाऱ्यांना भारनियमनाने त्रस्त करणे योग्य नाही. आम्ही आंदोलन छेडणार आहोत.
- महेंद्र साळवे
डेंग्यूची लागण झाल्यास...?
बिल अदा करूनही उपकरणे बंद असल्याने डेंग्यूची लागण झाल्यास त्यास जबाबदार कोण?
- हरिभाऊ राठोड
शनिवारी पाऊस पडल्याने रविवारी वीज सुरळीत
पावसाने ओढ दिल्याने विजेची मागणी वाढली. ती पूर्ण करण्यासाठी वरूनच हा निर्णय होता; परंतु शनिवारच्या पावसामुळे रविवारी सुरळीत वीजपुरवठा होता.
- महावितरण अभियंता