५८ वर्षांत विद्यापीठाने काय मिळविले; अभ्यास करा...
By Admin | Published: August 24, 2016 12:35 AM2016-08-24T00:35:20+5:302016-08-24T00:50:03+5:30
औरंगाबाद : मागील ५८ वर्षांत विद्यापीठाने काय मिळविले, विद्यापीठात कोणती कामे झाली आणि कोणती झाली नाहीत, याचा विद्याशाखानिहाय आणि विभागनिहाय अभ्यास करा,
औरंगाबाद : मागील ५८ वर्षांत विद्यापीठाने काय मिळविले, विद्यापीठात कोणती कामे झाली आणि कोणती झाली नाहीत, याचा विद्याशाखानिहाय आणि विभागनिहाय अभ्यास करा, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोेगाचे अध्यक्ष प्रो. वेदप्रकाश यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापनदिनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.
विद्यापीठाच्या नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे अध्यक्षस्थानी होते. आपल्या अर्ध्या तासाच्या अतिशय सुस्पष्ट भाषणात प्रो. वेदप्रकाश यांनी स्पष्ट केले की, विद्यापीठात प्रत्येक विभागाचे सुधारित असे शैक्षणिक ‘लक्ष्य’ असले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठाने चार गोष्टी कराव्यात. देश- विदेशातील दर्जेदार संस्थांच्या तुलनेत आपण कोठे आहोत याचा अभ्यास करण्यासाठी समर्पित भावनेने काम करणारा प्राध्यापकांचा गट नेमा, ५८ वर्षांतील विद्याशाखा तसेच विभागनिहाय आढावा घ्या, विद्यार्थी-प्राध्यापक आणि इतर स्टाफचे ‘लक्ष्य’ निश्चित करा आणि हे कसे शक्य करता येईल यासाठी समाजातील विविध घटकांसह विद्यापीठातील घटकांचा विचार करा, अशा या चार बाबी आहेत. विद्यापीठे ही समाजाची सर्वात मोठी अपेक्षा आहे. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना सक्षम करणे शिक्षक आणि विद्यापीठाचे काम आहे. विद्यार्थ्यांचे यश हाच आपला पुरस्कार असल्याचे भान प्राध्यापकांनी ठेवावे, अशी टोचणीही त्यांनी यावेळी (पान ५ वर)