धावत्या बसचे चाक निखळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:37 AM2017-08-29T00:37:24+5:302017-08-29T00:37:24+5:30
मुदगलहून पाथरीकडे येत असलेल्या धावत्या बसचे मागील चाक निखळून ५०० फुट अंतरावर जाऊन पडले़ सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही़ ही घटना पोहेटाकळी पाटीजवळ २८ आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० च्या सुमारास घडली़
लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी : मुदगलहून पाथरीकडे येत असलेल्या धावत्या बसचे मागील चाक निखळून ५०० फुट अंतरावर जाऊन पडले़ सुदैवाने बसमधील प्रवाशांना इजा झाली नाही़ ही घटना पोहेटाकळी पाटीजवळ २८ आॅगस्ट रोजी सकाळी १०़३० च्या सुमारास घडली़
पाथरीहून मुदगलकडे एमएच २० डी-९६०६ या क्रमांकाची बस सकाळी ७़३० वाजता निघाली़ मुदगलहून प्रवासी घेऊन परत येत असताना १०़३० वाजेच्या सुमारास ही बस पोहेटाकळी पाटीवर प्रवासी घेण्यासाठी थांबली़
या बसमध्ये काही प्रवासी बसल्यानंतर बस पाथरीकडे निघाली असता, काही अंतरावरच बसच्या मागील एका बाजूचे चाक अचानक निखळून ५०० फूट बाजूच्या शेतात जावून पडले़ बसचे चाल निखळले असताना बस चालकाने प्रसंगावधान राखून बस जागेवर थांबविल्याने पुढील अनर्थ टळला़ या बसमध्ये १२ ते १५ प्रवासी होते़ बसमधील कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नाही़ दरम्यान, या बसच्या अपघातासंदर्भात पाथरी बसस्थानकाचे आगारप्रमुख एम़एऩ चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनाच सायंकाळी ६ वाजेपर्यंत या घटनेची माहिती नव्हती़ हे विशेष होय.