दोन हजार ट्रकची चाके थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:04 AM2017-10-10T00:04:32+5:302017-10-10T00:04:32+5:30

आॅल इंडिया मोटार काँग्रेसने पुकारलेल्या दोन दिवसांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.९) जिल्ह्यात सुमारे दोन हजार ट्रक ठिकठिकाणी उभे राहिले. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांच्या मालाची वाहतूक ठप्प झाली.

The wheels of two thousand trucks stopped | दोन हजार ट्रकची चाके थांबली

दोन हजार ट्रकची चाके थांबली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आॅल इंडिया मोटार काँग्रेसने पुकारलेल्या दोन दिवसांच्या चक्का जाम आंदोलनाच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि.९) जिल्ह्यात सुमारे दोन हजार ट्रक ठिकठिकाणी उभे राहिले. त्यामुळे औद्योगिक कंपन्यांच्या मालाची वाहतूक ठप्प झाली.
‘जीएसटी’ने निर्माण होणाºया अडचणी, डिझेलच्या दरात झालेली भरमसाठ वाढ यासह विविध प्रश्न आणि मागण्यांसाठी आॅल इंडिया मोटार काँग्रेसने ‘चक्का जाम’ची हाक दिली आहे.
या आंदोलनाला पाठिंबा देत औरंगाबाद गुडस् ट्रान्स्पोर्ट असोसिएशन सहभागी झाले आहे. औरंगाबादलगतच्या वाळूज, शेंद्रा, चितेगावसह चिकलठाणा येथील औद्योगिक वसाहतींमध्ये दररोज सुमारे २५०० ट्रकमधून कच्चा माल येतो. तेवढ्याच ट्रकमधून तयार झालेला माल देशभरात पाठविण्यात येतो. चक्का जाम आंदोलनात पहिल्याच दिवशी मालवाहतूकदारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. त्यामुळे ठिकठिकाणी जवळपास दोन हजार ट्रक जागेवरच उभे राहिले.
देशभरात आंदोलन पुकारण्यात आल्याने औरंगाबाद शहरालगच्या कंपन्यांना पुरवठा होणारºया कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे कंपन्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे कंपन्यांमध्ये तयार मालही पडून असल्याचे असोसिएशनच्या पदाधिकाºयांनी सांगितले.

Web Title: The wheels of two thousand trucks stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.