उसने पैसे परत मागताच रॉडने मारहाण करीत दोघांवर चाकूहल्ला

By बापू सोळुंके | Published: May 27, 2023 06:03 AM2023-05-27T06:03:20+5:302023-05-27T06:03:33+5:30

छत्रपती संभाजीनगर: ऊसने दिलेले पैसे परत मागीतल्याच्या कारणातून झालेल्या वादात तीन तरुणांनी दोघांवर  धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी ...

When Isha demanded the money back, he beat them with a rod and stabbed them both | उसने पैसे परत मागताच रॉडने मारहाण करीत दोघांवर चाकूहल्ला

उसने पैसे परत मागताच रॉडने मारहाण करीत दोघांवर चाकूहल्ला

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर: ऊसने दिलेले पैसे परत मागीतल्याच्या कारणातून झालेल्या वादात तीन तरुणांनी दोघांवर  धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना कुंवारफल्ली येथे शुक्रवारी दुपारी  घडली. या घटनेत निलेश अर्जुन लुटे (वय२४ वर्ष, रा. जुना बायजीपुरा) हे गंभीर जखमी झाले तर त्याचा मित्र संपत चापला यांनाही मार लागला आहे. या घटनेविषयी सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

    रोहीत विजय कावेटी (रा. खडकेश्वर ), गौरव जेठावाले आणि अन्य एका अनोळखींचा आरोपीमध्ये समावेश आहे.  या घटनेविषयी प्राप्त माहिती अशी की,  निलेश लुटे  आणि आरोपी रोहीत हे मित्र आहेत. निलेशने शुक्रवारी दुपारी रोहित यास  फोन करून उसने दिलेले पैसे परत मागीतले. याचा राग आल्याने आरोपीने निलेशला फोनवर शिवीगाळ करत त्याला कुवारफल्ली, जैन मंदिरा समोर येण्यास सांगितले.  निलेश आणि त्याचा मित्र संपत हे दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास तेथे गेले असता रोहित अन्य आरोपींसह तेथे पोहचला. यावेळी त्याने त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरवात केली.  रोहित आणि त्याच्या अनोळखी साथीदाराने  निलेशला लोखंडी रॉडने मारहाण केली.  आरोपी गौरवने निलेशच्या डोक्यात चाकूने वार करून गंभीर जखमी केले. दुसरा वार निलेशने घाव हातावर झेलल्यामुळे त्याच्या हाताला  खोलवर जखम झाली. त्यांचे भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या संपत चापला याच्यावरसुद्धा आरोपीने चाकूचा वार करून जखमी केले.  या घटनेत नीलेश गंभीर जखमी झाल्याचे पाहून आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. या घटनेनंतर  याप्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात जिवे   मारण्याचा प्रयत्न केल्याचा  गुन्हा नोंदविण्यात आला. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक  प्रशांत मुंडे हे करत आहेत.

जुगाराच्या पैशातून वाद झाल्याची चर्चा
उसन्या पैशाच्या वादातून ही घटना घडल्याची नोंद पोलीस दरबारी करण्यात आली आहे. असे असेल तरी जुगाराच्या पैशाच्या हिस्सेदारीतून आरोपींमध्ये भांडण झाले आणि यातूनच तिघांनी हा हल्ला केल्याची चर्चा घटनास्थळ परिसरात होती. या घटनेचे खरे कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करीत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: When Isha demanded the money back, he beat them with a rod and stabbed them both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.