ओव्हरटेक करताना दुचाकी दुभाजकावर धडकली; दुचाकीस्वार ठार, दोन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 05:31 PM2019-11-14T17:31:00+5:302019-11-14T17:33:55+5:30

हा अपघात गुरूवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चिकलठाणा बाजारतळासमोर घडला.

When overtaking, the bike hit the divider; Two-wheeler rider killed, two injured | ओव्हरटेक करताना दुचाकी दुभाजकावर धडकली; दुचाकीस्वार ठार, दोन जखमी

ओव्हरटेक करताना दुचाकी दुभाजकावर धडकली; दुचाकीस्वार ठार, दोन जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देदुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थोराळ्यात पडला.

औरंगाबाद: दारूच्या नशेत बसला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव दुचाकी रस्त्यावरील दुभाजकला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीचालक ठार झाला तर त्याच्यासोबतचे अन्य दोन जण जखमी झाले. हा अपघात गुरूवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास जालना रोडवरील चिकलठाणा बाजारतळासमोर घडला.

श्रावण नामदेव चव्हाण (२६,रा. पारधीवाडा, परतुर, जि. जालना)असे मृताचे नाव आहे. संजय शिवाजी चव्हाण(३५) आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार रईस बोक्या अशी जखमींची नावे आहेत. याविषयी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, श्रावण चव्हाण आणि संजय चव्हाण यांचे नातेवाईक पडेगाव येथे राहातात. श्रावणची सासुरवाडी पडेगावमध्ये आहे. ते दोघे मोटारसायकलने पडेगाव येथे नातेवार्इंकाना भेटण्यासाठी आले होते. त्यांची ओळख रईस बोक्यासोबत झाली होती. रात्री त्यांनी एकत्र बसून दारू पिली. नंतर पहाटे चार वाजेच्या सुमारास ते ट्रिपलसीट मोटारसायकलने परतुरला जाऊ लागले. चिकलठाणा बाजारतळाजवळ समोरून जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसला ओव्हरटेक करून ते पुढे जाण्याच्या प्रयत्नात असताना श्रावणचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि भरधाव दुचाकी दुभाजकला धडकली. या अपघातात श्रावणच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रक्ताच्या थोराळ्यात पडला. त्याच्यासोबतचे संजय आणि रईस बोक्या हे जखमी झाले. 

या अपघाताचे दृश्य पाहून वाहनचालकांनी त्यांची वाहने थांबविली.  या घटनेची माहिती एमआयडीसी सिडको पोलिसांना कळविण्यात आली. यांनतर अवघ्या काही मिनिटात पोलिसांनी तेथे धाव घेतली. यानंतर गंभीर जखमी होवून बेशुद्ध पडलेल्या श्रावणला आणि जखमी संजयला तात्काळ घाटी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघात विभागातील डॉक्टरांनी श्रावणला तपासून मृत घोषित केले. याविषयी एमआयडीसी सिडको ठाण्यात नोंद करण्यात आली.सहायक पोलीस उपनिरीक्षक सांगळे, पोहेकाँ शेख हे या घटनेचा तपास करीत आहेत.

Web Title: When overtaking, the bike hit the divider; Two-wheeler rider killed, two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.