चलनातून बाद नोटा येतात कोठून ? दोन लाखांच्या बाद नोटांसह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 07:35 PM2021-03-10T19:35:04+5:302021-03-10T19:35:40+5:30

Where do ban currency notes come from? विनाक्रमांकाच्या दुचाकीवर बसून आलेल्या संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Where do ban currency notes come from? Young police nabbed with two lakh notes | चलनातून बाद नोटा येतात कोठून ? दोन लाखांच्या बाद नोटांसह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

चलनातून बाद नोटा येतात कोठून ? दोन लाखांच्या बाद नोटांसह तरुण पोलिसांच्या जाळ्यात

googlenewsNext

औरंगाबाद : चलनातून बाद झालेल्या ५०० रुपये दराच्या तब्बल ४०० नोटा घेऊन आलेल्या एका तरुणाला चिकलठाणा पोलिसांनी सापळा रचून मध्यरात्री पकडले. त्याच्या ताब्यातून दोन लाखांच्या बाद नोटा, दुचाकी आणि मोबाईल जप्त केला.

गणेश मच्छिंद्र राठोड (वय २७, रा. देवळाई परिसर) असे या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, एक तरुण चलनात नसलेल्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी निपाणी फाटा ते व्हिडिओकॉन कंपनीजवळ येणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. यानंतर सहायक निरीक्षक विश्वास पाटील, हवालदार अजित शेकडे, रवींद्र साळवे, सोपान डकले, दीपक सुराशे, संतोष टिमकीकर आणि अण्णा गावंडे यांच्या पथकाने मध्यरात्री १२ वाजता सापळा रचला.

यावेळी विनाक्रमांकाच्या दुचाकीवर बसून आलेल्या संशयित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता चलनातून बाद झालेल्या ५०० रुपयांच्या तब्बल ४०० नोटा त्याच्याजवळ आढळून आल्या. या नोटा त्याने कुठून आणल्या आणि तो कोणाला देणार होता, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला.
 

Web Title: Where do ban currency notes come from? Young police nabbed with two lakh notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.