चारा कुठे, छावणीला की दावणीला? निर्णयच होईना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 04:32 AM2019-01-23T04:32:16+5:302019-01-23T04:32:22+5:30

मराठवाड्यात दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसत आहेत.

 Where is the feed, the camp to the camp? Decide | चारा कुठे, छावणीला की दावणीला? निर्णयच होईना

चारा कुठे, छावणीला की दावणीला? निर्णयच होईना

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळामुळे चाऱ्याची अडचण निर्माण झाली असून, विभागातील ६७ लाख ६१२ जनावरांना (पशुधनाला) दुष्काळाच्या झळा बसत आहेत. पशुसंवर्धन विभागाने शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार जानेवारीपर्यंत चारा पुरेल, अशी स्थिती असताना, चारा छावणीला द्यायचा की दावणीला, याबाबतचे धोरण सरकारी दरबारी ठरलेले नाही.
परिणामी, पुढील सहा महिने म्हणजेच जून, २०१९ पर्यंत शेतकºयांना जनावरे जगविणे अवघड ठरणार आहे. विभागात ३६ लाख २५ हजार ४९० मोठी जनावरे आहेत. ११ लाख ३६ हजार ३९४ लहान जनावरे आहेत. शेळ्या व मेंढ्यांची संख्या १९ लाख ४५ हजार ७२८ आहे. मराठवाड्यात दिवसाला २६ हजार ३३० टन इतका चारा लागतो. जनावरांसाठी दररोज १२ ते २० किलो इतक्या चाºयाची आवश्यकता असते. सध्या अंदाजे ५ कोटी ७४ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध आहे. दुष्काळामुळे उपलब्ध चाराही घटणे शक्य आहे. जानेवारीपर्यंत पुरेल इतकाच हा चारा असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे. या वर्षीच्या पावसाळ्यात मराठवाड्यात कमी पाऊस झाला. ६३ टक्के पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले, शिवाय चाराही उपलब्ध होणार नाही. त्यामुळे शेतकºयांसमोर जनावरांना जगविण्याचा मोठा प्रश्न आहे. जून २०१९ पर्यंत चारा कमी पडणार नाही. एका गावात पिण्यासाठी दोन टँकरने पाणीपुरवठा होत असेल, तर पशुधनासाठी देखील दोन टँकर पिण्याचे देण्याबाबत तातडीने तरतूद करण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकाºयांना पशुसंवर्धनमंत्र्यांनी डिसेंबर २०१८ मध्ये दिले होते, परंतु त्यानुसार काहीही निर्णय झालेला नाही.
महसूल उपायुक्तांची
माहिती अशी
प्रभारी महसूल उपायुक्त डॉ. विजयकुमार फड म्हणाले, चारा छावण्यांबाबत शासनाकडून अजून कुठलाही धोरणात्मक निर्णय झालेला नाही, तसेच शासनाकडून अजून काहीही सूचना विभागीय प्रशासनाला आलेल्या नाहीत.

>काय म्हणाले होते पशुसंवर्धनमंत्री...
मराठवाड्यातील पशुधनाला चारा कमी पडल्यास पालघर येथील पशुसंवर्धन विभागाच्या जमिनीवरील चारा रेल्वेने पुरविला जाईल. छावणीतूनच पशुधनासाठी चारा आणि पाणी द्यावे लागेल, असे पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी १३ डिसेंबर रोजी स्पष्ट केले होते. दीड महिना होत आला असून, चारा छावणीबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
>जिल्हानिहाय पशुधन
जिल्हा पशुधन
औरंगाबाद १० लाख ६७ हजार ४१२
जालना ६ लाख ९९ हजार २४
परभणी ६ लाख २२ हजार २००
बीड १२ लाख २४ हजार ७९८
लातूर ७ लाख ५२ हजार ४२६
उस्मानाबाद ७ लाख ३७ हजार ३४७
नांदेड ११ लाख ४४ हजार ७२५
हिंगोली ४ लाख ५९ हजार ६८०
एकूण ६७ लाख ६१२

Web Title:  Where is the feed, the camp to the camp? Decide

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.