लाच घेताना हवालदारास पकडले
By Admin | Published: September 19, 2014 11:57 PM2014-09-19T23:57:07+5:302014-09-20T00:06:42+5:30
गंगाखेड :तालुक्यातील पिंपळदरी येथील पोलिस हवालदार व्यंकटेश संग्राम कामजळगे यांना पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले.
गंगाखेड :तालुक्यातील पिंपळदरी येथील पोलिस हवालदार व्यंकटेश संग्राम कामजळगे यांना पाचशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले.
गंगाखेड तालुक्यातील जवळा रुमना येथील कोंडीबा माणिकराव कदम यांच्याविरुद्ध गंगाखेड न्यायालयाने काढलेल्या अजामीनपात्र वॉरंटमध्ये अटक न करता न्यायालयातून वॉरंट रद्द करुन घेण्याची सवलत देण्यासाठी पाचशे रुपयांच्या लाचेची मागणी व्यंकटेश कामजळगे यांनी केली होती. १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.२० वाजण्याच्या सुमारास गंगाखेड पोलिस ठाण्याजवळील एका हॉटेलमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने त्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक सरदेशपांडे व अप्पर पोलिस अधीक्षक एन.व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अनिल गायकवाड, पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार, विकास पाटील, पोलिस नायक चंदन परिहार, शिवाजी भोसले, पोलिस हवालदार राजू ननवरे, शिवाजी बोंडले, सचिन गुरसुडकर, अविनाश पवार, वाहनचालक बोके, डुबे यांनी ही कारवाई केली.(प्रतिनिधी)