व्हिस्कीने २०२३ मध्ये वाढवला महसूल, छत्रपती संभाजीनगरात साडेतीन हजार कोटींची रिचवली दारू

By सुमित डोळे | Published: December 29, 2023 03:37 PM2023-12-29T15:37:57+5:302023-12-29T15:40:01+5:30

राज्याच्या तिजोरीत जिल्ह्याने दिला कोट्यवधी महसूल : गतवर्षीच्या तुलनेत ६ टक्के वाढ

Whiskey increased revenue in 2023, Rs 3,500 crore worth of liquor in Chhatrapati Sambhajinagar district | व्हिस्कीने २०२३ मध्ये वाढवला महसूल, छत्रपती संभाजीनगरात साडेतीन हजार कोटींची रिचवली दारू

व्हिस्कीने २०२३ मध्ये वाढवला महसूल, छत्रपती संभाजीनगरात साडेतीन हजार कोटींची रिचवली दारू

छत्रपती संभाजीनगर : मद्य विक्रीची परंपरा यंदा मोडीत काढत व्हिस्कीने (विदेशी दारू) यंदाच्या महसुलात सर्वाधिक वाटा वाढवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ११.५ टक्क्यांनी वाढ होत नऊ महिन्यांमध्ये ५२ लाख ७४ हजार २१० लिटर व्हिस्की रिचवली गेली. यात एकट्या ऑक्टोबरमध्ये ६ लाख ८७ हजार ५८८ लिटर व्हिस्कीचा खप झाला, तर जून महिन्यात गतवर्षीच्या तुलनेत २७ % टक्क्यांनी वाढ होत बीअरची सर्वाधिक ५ लाख ५३ हजार ७८७ लिटर विक्री झाली.

राज्याच्या तिजोरीत मद्यनिर्मिती व खपाद्वारे सर्वाधिक महसूल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून जमा होतो. यंदा विभागाचे वार्षिक ६ हजार ३१३ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी जिल्ह्याने ८६ टक्के उद्दिष्ट पूर्ण केले. विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, अधीक्षक संतोष झगडे यांनी अवैध दारूविक्रीवर कारवाया केल्या. १,२२४ कारवायांमध्ये १,२३६ आरोपी पकडले गेले. परिणामी, दारूची अवैध विक्री करणाऱ्या ढाबा, हॉटेलचालकांनी बार लायसन्स घेण्यावर भर दिला. त्यातून ४९ बार वाढले.

अशी होते दारूनिर्मिती व विक्री

-गोदावरीचे पाणी मद्यनिर्मितीसाठी पूरक असल्याने जिल्ह्यात सर्वाधिक कारखाने.
-चिकलठाणा, वाळूज, गंगापूर, शेंद्रा औद्योगिक वसाहतीत हे कारखाने.

-७ कारखान्यांमध्ये बीअर, तर ६ कारखान्यांमध्ये विदेशी मद्यनिर्मिती होते.
-जिल्ह्यात ११५ देशी दारू दुकाने, ७४८ बार व ३५ वाइन शॉप.

काय सांगते आकडेवारी ? (लिटर मध्ये)
वर्षे             देशी                         विदेशी बीअर वाइन
२०२३ १,१०,५२,७१० ५२,७४,२१० ४८,८९,९९१ १,०४,००१
२०२२ १,०६,९२,१५४ ४७,३२,३५१ ४४,६७,११० १,०८,९९८

वाइन विक्रीत यंदा घट
जिल्ह्यात यंदा वाइन विक्रीमध्ये ४.६ टक्क्यांची आश्चर्यकारकरीत्या घट झाली. सर्वाधिक १४,०५३ लिटर वाइन ऑगस्ट महिन्यात रिचवली गेली. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच सर्वाधिक वाइनविक्री झाली होती.

नोव्हेंबरमध्येच सर्वाधिक दारू विक्री
एप्रिल ते नोव्हेंबर महिन्यात ३,४०९ कोटींचा मद्यविक्रीतून महसूल मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत १९४.३१ कोटींनी हा वाढला. नोव्हेंबर महिन्यात सर्वाधिक ४७५.७३ कोटींची दारूविक्री झाली, तर त्या खालोखाल ४५७ कोटींची दारूविक्री झाली होती.

Web Title: Whiskey increased revenue in 2023, Rs 3,500 crore worth of liquor in Chhatrapati Sambhajinagar district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.