कर कमी करण्यासाठी घेतला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने रंगेहाथ पकडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 11:15 AM2022-04-02T11:15:40+5:302022-04-02T11:16:13+5:30

औरंगाबादेतील प्रकार; एसीबीने पकडले रंगेहाथ

Whiskey pole taken to reduce taxes, ACB caught red handed | कर कमी करण्यासाठी घेतला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने रंगेहाथ पकडले

कर कमी करण्यासाठी घेतला व्हिस्कीचा खंबा, एसीबीने रंगेहाथ पकडले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क     
औरंगाबाद : मालमत्ता कर कमी करण्यासाठी घरमालकाकडून लाचेच्या स्वरूपात साडेतीन हजार रुपये आणि व्हिस्कीचा खंबा   घेताना महापालिकेच्या लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी सिडको परिसरात करण्यात आली. प्रभू लक्ष्मण चव्हाण (५२) असे अटकेतील कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे.   

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सिडको एन ६ मधील रहिवासी विठ्ठल गजानन दाभाडे यांचे संभाजी कॉलनीत घर आहे. त्यांना महापालिकेच्या वॉर्ड  ब कडून मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाली होती. हा कर कमी करावा, याकरिता त्यांनी कनिष्ठ लिपिक प्रभू चव्हाण याची भेट घेतली. तेव्हा त्याने कर कमी करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी दाभाडे यांच्याकडे केली. दाभाडे यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी चव्हाणची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचासमक्ष ३० मार्च रोजी लाचेच्या मागणीची पडताळणी केली तेव्हा आरोपीने तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. यापैकी नगदी दीड हजार रुपये घेतले. उर्वरित साडेतीन हजार रुपये आणि दारूचा एक खंबा ३१ मार्च रोजी आणून देण्याचे सांगितले. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सायंकाळी सिडको वॉर्ड कार्यालय परिसरात सापळा रचला.

Web Title: Whiskey pole taken to reduce taxes, ACB caught red handed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.