कुजबुज-
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:03 AM2021-07-20T04:03:56+5:302021-07-20T04:03:56+5:30
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ताई, तुम्ही औरंगाबादेत येऊन दोन दिवस मुक्कामी राहिलात. पक्ष, संघटनेचा आढावाही घेतलात. तो घेताना तुम्ही ...
महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ताई, तुम्ही औरंगाबादेत येऊन दोन दिवस मुक्कामी राहिलात. पक्ष, संघटनेचा आढावाही घेतलात. तो घेताना तुम्ही चक्क बोगस कमिट्या सहन केल्या जाणार नाहीत, असा दमच भरला. आता औरंगाबादेत येऊन, ‘कमिट्या बोगस असल्या तर’ तुमच्या या कोड्यात बोलण्याचा संदर्भ अनेकांना प्रारंभी लागलाच नाही. काहींनी मात्र नंतर लगेच चर्चा सुरू केली की, औरंगाबादच्या शहर, जिल्हा अध्यक्षांची निवड झाली. या निवडीला आता वर्ष होऊन त्यावर काही महिनेही लोटले आहेत. पण कमिटीचे सदस्य मात्र अद्याप ठरलेले नाहीत. दोन्ही कमिट्यांची नावे शीर्षस्थ नेत्यांकडे पाठविल्याचे अध्यक्ष महोदयांनी अनेकदा मंचावरून सांगितले. पण त्या कमिट्या काही अधिकारावर आल्या नाहीत. त्यात काही बनवेगिरी असल्याचे तर ताईला सुचवायचे नव्हते ना, अशी चर्चा मग भवनात रंगली होती.