कुजबुज पान २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:06 AM2021-09-12T04:06:02+5:302021-09-12T04:06:02+5:30

वेगवेगळ्या कामांसाठी रोज असंख्य नागरिक महापालिका मुख्यालयात येतात. प्रत्येक विभागात, मुख्यालयाच्या इमारतीत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. एक ...

Whisper page 2 | कुजबुज पान २

कुजबुज पान २

googlenewsNext

वेगवेगळ्या कामांसाठी रोज असंख्य नागरिक महापालिका मुख्यालयात येतात. प्रत्येक विभागात, मुख्यालयाच्या इमारतीत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. एक सदगृहस्थ अलीकडेच एका कामासाठी मनपा आले. ज्या ठिकाणी त्यांचे काम होते त्या विभागातील अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. बाहेर पडताना त्यांच्या लक्षात आले की, आपला चष्मा हरवला आहे. ते परत संबंधित विभागात गेले. माझा चष्मा येथे राहिला का, अशी विचारणा केली. शिपाई, अधिकाऱ्यांनी नाही, असे उत्तर दिले. सदगृहस्थ जिद्दीला पेटले. चष्मा इथेच होता. गेला कुठे. शोधून द्या, असा आग्रह त्यांनी केला. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी डोक्याला हात लावून घेतला. सदगृहस्थ एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी ‘मला सीसीटीव्ही फुटेज द्या,’ असा प्रशासनाकडे लेखी अर्जही केला. हा अर्ज पाहून अधिकारी क्षणभर अवाक् झाले. वरिष्ठांकडे अर्ज नेण्यात आला. वरिष्ठांनी अशा पद्धतीने ‘सीसीटीव्ही फुटेज’ देता येत नाही, त्यांना पोलिसात गुन्हा दाखल करायला सांगा. पोलिसांनी मागितले, तरच फुटेज द्या, असा वरिष्ठांनी सूचविले. हे ऐकून बिचारे सदगृहस्थ पुन्हा महापालिकेत परतलेच नाहीत...!

Web Title: Whisper page 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.