तुमच्यासाठी आम्ही, आमच्यासाठी कोण? - औरंगाबादच्या डॉक्टरांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:00 AM2018-04-28T00:00:37+5:302018-04-28T00:01:17+5:30

घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी ‘मास बंक’ आंदोलन पुकारले. ‘तुमच्यासाठी...’ या आंदोलनाच्या दुसºया दिवशी त्यांनी घाटीतून रॅली काढली व आपल्या मागण्या पूर्ततेच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.

Who are you for us? - Aurangabad doctor's question | तुमच्यासाठी आम्ही, आमच्यासाठी कोण? - औरंगाबादच्या डॉक्टरांचा सवाल

तुमच्यासाठी आम्ही, आमच्यासाठी कोण? - औरंगाबादच्या डॉक्टरांचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देदुसऱ्या दिवशी निवासी डॉक्टरांची रॅली; मागण्या पूर्ततेच्या भूमिकेवर डॉक्टर ठाम

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांकडून एका निवासी डॉक्टरला धक्काबुक्की केल्याची घटना बुधवारी (दि.२५) रात्री घडली. या सगळ्या प्रकारानंतर मध्यरात्रीनंतर निवासी डॉक्टरांनी ‘मास बंक’ आंदोलन पुकारले. ‘तुमच्यासाठी...’ या आंदोलनाच्या दुसºया दिवशी त्यांनी घाटीतून रॅली काढली व आपल्या मागण्या पूर्ततेच्या भूमिकेवर ठाम असल्याचे सांगितले.
घाटीतील डॉक्टरला मारहाणप्रकरणी निवासी डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी निषेध रॅली काढली होती. असुरक्षितता वाटणाºया निवासी डॉक्टरांनी रॅली काढून ‘तुमच्यासाठी आम्ही, आमच्यासाठी कोण?’ ‘डॉक्टर काही देव नाही, वारंवार होणारे हल्ले थांबवा’, रात्रंदिवस रुग्णसेवेत तत्पर असणाºया डॉक्टरवरील हल्ल्याचा निषेध करण्यात आला.
त्याकडे लक्ष वेधत सकाळी निवासी डॉक्टरांनी विविध घोषणा फलक घेऊन अपघात विभागापर्यंत रॅली काढली. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी घाटीतील निवासी डॉक्टर बुधवारी मध्यरात्रीपासून संपावर आहेत. आंदोलनामुळे गुरुवारी दिवसभर व शुक्रवारी सकाळी तब्बल ३१२ निवासी डॉक्टर गैरहजर राहिले. यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्याने सहयोगी प्रा. डॉ. सुरेश हरबडे हे अपघात विभागात पोहोचले. धक्काबुक्की केल्याचा आरोप करून निवासी डॉक्टरांनी मध्यरात्रीपासून ‘मास बंक’ करीत काम बंद केले. या प्रकाराची माहिती मिळताच अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे आणि वरिष्ठ डॉक्टरांनी घाटीत धाव घेऊन निवासी डॉक्टरांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी अधिष्ठातांच्या कक्षात उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, डॉ. अरविंद गायकवाड, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक पोलीस आयुक्त गोवर्धन कोळेकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही म्हणून शुक्रवारी निवासी डॉक्टरांनी रॅली काढून कैफियत मांडली.
अतिदक्षता सेवेला प्राधान्य दिले...
निवासी डॉक्टरांच्या संपावर अद्याप तोडगा निघालेला नसला, तरी अतिदक्षता सेवेला प्राधान्य देण्यात आले आहे. काही रुग्णांना औषधोपचार देऊन पुढील तारखेला बोलावले आहे. बैठकीत काही निवासी डॉक्टरांनी कामावर येण्यासाठी संमती दिली आहे.
-डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता
सुरक्षा यंत्रणेचे आॅडिट केले
घाटीतील सुरक्षा यंत्रणेचे आॅडिट केले असून, याविषयी लवकरच बैठक घेऊन ते मांडण्यात येईल. डॉक्टरांच्या विविध मागण्यांसंदर्भात स्थानिक प्रश्नांवर आठ दिवसांत निर्णय घेण्यात येणार आहे.
-डॉ. भारत सोनवणे, वैद्यकीय अधीक्षक

Web Title: Who are you for us? - Aurangabad doctor's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.