डाॅक्टरांचा डाॅक्टर कोण? आजारी पडले तर कोण करतो उपचार, स्वत:च घेतात औषधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2022 07:55 PM2022-01-24T19:55:31+5:302022-01-24T19:56:17+5:30

रुग्ण घेतात डाॅक्टरांकडे धाव, मग डाॅक्टर कोणाकडे जातात?

Who is the doctor of doctors? If you get sick, who treats you, takes medicine yourself? | डाॅक्टरांचा डाॅक्टर कोण? आजारी पडले तर कोण करतो उपचार, स्वत:च घेतात औषधी ?

डाॅक्टरांचा डाॅक्टर कोण? आजारी पडले तर कोण करतो उपचार, स्वत:च घेतात औषधी ?

googlenewsNext

- संताेष हिरेमठ
औरंगाबाद : सर्वसामान्य नागरिक आजारपणात डाॅक्टरांकडे धाव घेतात. डाॅक्टरांनी एकदा पाहिले की लगेच बरे होते, असा बहुतांश जणांचा अनुभव असतो. पण तेच डाॅक्टर जेव्हा आजारी पडतात, तेव्हा ते काय करतात, ते कोणाकडे उपचार घेत असतील की, डाॅक्टर असल्याने स्वत:च स्वत:साठी औषधी घेऊन मोकळे होतात, असे कुतुहल सर्वसामान्यांमध्ये पाहायला मिळते. याच कुतुहलाविषयी ‘लोकमत’ने काही डाॅक्टरांशी संवाद साधत त्यांना ‘डाॅक्टरांचा डाॅक्टर कोण?’ याविषयी बोलते केले.

माणसाला कधी ना कधी आजारांना तोंड द्यावेच लागते. मग अशावेळी लगेच डाॅक्टरांकडे धाव घेतली जाते. रुग्णालयात जायचे, नंबर लावायचा, मग होणारा त्रास डाॅक्टरांना सांगायचा आणि डाॅक्टरांकडून औषधी लिहून घ्यायची. हे झाले सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत. पण रूग्णांच्या वेदना दूर करणारे डाॅक्टरही कधी तरी आजारी पडतातच. मग आजारी पडल्यावर डाॅक्टर स्वत: औषधी लिहीत असतील आणि ती औषधी आणून घेत असतील, असाच सर्वसामान्यांचा समज आहे. परंतु, प्रत्यक्षात असे नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. प्रत्येक आजार हा वेगवेगळा असतो. प्रत्येक डाॅक्टर त्या-त्या आजाराचा तज्ज्ञ असतो. त्यामुळे डाॅक्टरांचाही कोणीतरी डाॅक्टर असतो. ज्यांच्याकडे ते उपचार, सल्ला घेतात. क्वचित किरकोळ आजारासाठी स्वत:च एखादी औषधी डाॅक्टर मागवून घेतात. कारण तेवढी माहिती डाॅक्टरांकडे असते, असे तज्ज्ञांनी सांगितले.

स्पेशालिस्ट डाॅक्टरांचा सल्ला
डाॅक्टर असलो तरी आजारपणात स्वत:च औषधी घेत नाहीत. फिजिशियनचा सल्ला घेण्यास प्राधान्य देते. ‘एमबीबीएस’मध्ये बेसिक माहिती असते. परंतु, तरीही स्वत:च्या मनाने औषधोपचार टाळते. त्या-त्या स्पेशालिस्ट डाॅक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगले.
- डाॅ. वर्षा रोटे-कागीनाळकर, अधिष्ठाता, घाटी

स्वत:च्या मनाने नाही
मला काही त्रास झाला तर मी फिजिनिशयनचा सल्ला घेतो. संबंधित डाॅक्टरांशी चर्चा करतो. पण स्वत:च्या मनाने स्वत:चा कोणत्याही प्रकारे औषधोपचार करत नाही.
- डाॅ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, आयएमए

डाॅक्टर मित्रांचा सल्ला
आम्ही जरी डाॅक्टर असलो तरी आजारपणात फिजिशियनचा सल्ला घेतलाच जातो. सेल्फ मेडिकेशन हे कधीही धोकादायक असते. आजारपणात मी माझ्या डाॅक्टर मित्रांचा सल्ला घेत असतो.
- डाॅ. प्रदीप कुलकर्णी, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक

Web Title: Who is the doctor of doctors? If you get sick, who treats you, takes medicine yourself?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.