जिल्हा रुग्णालयात इंजेक्शन सांभाळण्याची जबाबदारी कुणाची; ते बाहेर आले कसे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:11+5:302021-04-18T04:04:11+5:30
औरंगाबाद: कोरोना रुग्णांवर परिणामकारक समजल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी एक टोळी पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केली. ...
औरंगाबाद: कोरोना रुग्णांवर परिणामकारक समजल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारी एक टोळी पुंडलिकनगर पोलिसांनी शुक्रवारी गजाआड केली. परंतु, इंजेक्शन सांभाळण्याची जबाबदारी कुणाची ते बाहेर आणले कसे, याचा खुलासा जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक यांच्याकडे पत्र देऊन मागितला आहे.
आरोपींमध्ये ओमप्रकाश बोहते हा जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि मंदार अनंत भालेराव व अभिजित नामदेव तौर या दोन औषध विक्रेत्यांचा समावेश आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जी. बी. सोनवणे आणि पोहेकॉ. रमेश सांगळे यांच्या पथकाने सांगितले की, आरोपींमध्ये ओमप्रकाश बोहते यास सोबत घेऊन शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी यांच्याकडे लेखी पत्र देऊन तपासासाठी लागणाऱ्या विविध बाबींचा समावेश त्यात केला आहे. रेडमेसिविर इंजेक्शन दवाखान्याबाहेर आणण्यासाठी त्याचे अजून कोण-कोण साथीदार आहेत. शासकीय रुग्णालयातील चोरी झालेले इंजेक्शन बोहते याच्या हाती लागले कसे, वर्षभरात किती इंजेक्शन बेपत्ता झालेले आहेत. चतुर्थश्रेणी कर्मचारी अनिल बोहते याने तीन रेमडेसिविर इंजेक्शन विक्रीसाठी दिल्याचे मंदारने सांगितले. तसेच इंजेक्शनच्या या काळ्या बाजारात अभिजित तौर याचाही सहभाग असल्याचे सांगितले. पोलिसांनी लागलीच कारवाई करीत त्या दोघांनाही ताब्यात घेतले आहे. या टोळीने आतापर्यंत किती इंजेक्शन विक्री केले, त्यांच्यासोबत आणखी साथीदार आहेत का, याचा शोध घेण्यासाठी बीड येथे पथक पोहोचले असून, कुठून इंजेक्शन आणले याचा शोध घेत आहेत.
घाटीतून चोरीचे इंजेक्शन बाजारात कसे ?
शासकीय रौग्णालयातील या टोळीत कोण सूत्रधार आहे, त्यादृष्टीने पोलीस शोध घेत आहेत. चोरीचे इंजेक्शन विकणारी टोळी सापडल्याने टोळीतील आणखी काही कडी सापडण्याची शक्यता पथकाने वर्तविली आहे.