अधिसभा, विद्या परिषद अन् अभ्यास मंडळाचा तख्त कुणाला मिळणार? मतमोजणीस सुरुवात

By संतोष हिरेमठ | Published: December 13, 2022 12:47 PM2022-12-13T12:47:14+5:302022-12-13T12:47:14+5:30

२१३ उमेदवारांचा आज फैसला, मतमोजणी सुरू

Who will get the throne of Adhisabha, Vidya Parishad and Study Board? | अधिसभा, विद्या परिषद अन् अभ्यास मंडळाचा तख्त कुणाला मिळणार? मतमोजणीस सुरुवात

अधिसभा, विद्या परिषद अन् अभ्यास मंडळाचा तख्त कुणाला मिळणार? मतमोजणीस सुरुवात

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया सुरू झाली आहे. 

क्रीडा विभागातील बॅडमिंटन हॉलमध्ये  मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी तीन सत्रांत मिळून ७० शिक्षक, १४० अधिकारी-कर्मचारी तसेच ३० वर्ग चार कर्मचारी अशी २४० जणांची नियुक्ती केली आहे. अधिष्ठाता, उपकुलसचिव यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अधिसभेच्या विद्यापीठ शिक्षकांच्या ३ जागांसाठी ९ उमेदवार आणि १२८ मतदार, संस्था चालकांच्या ४ जागांसाठी ८ उमेदवार आणि १६९ मतदार, प्राचार्यांच्या ८ जागांसाठी १४ उमेदवार आणि ७८ मतदार, महाविद्यालयीन शिक्षकांच्या १० जागांसाठी ३९ उमेदवार आणि २ हजार ५८७ तर विद्या परिषदेच्या ६ जागांसाठी १९ उमेदवार आणि १ हजार २४३ मतदार होते. विद्या परिषद या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविद्यालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते.कमी वेळेत मतमोजणी होऊन निवड प्रमाणपत्र तत्काळ वितरणाची व्यवस्था केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी, कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी दिली.

या निवडणुकीत अधिसभेच्या २५ व विद्यापरिषदेच्या सहा जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. दोन्ही गटात मिळून तीन जागा बिनविरोध आल्या असून तीन जागा रिक्त राहिल्या आहेत. 
या निवडणुकीत प्रवर्गनिहाय निवडणूक झालेल्या जागा, उमेदवार व मतदारांची संख्या अनुक्रमे पुढीलप्रमाणे :-
अधिसभा : विद्यापीठ शिक्षक - ३ जागा, ९ उमेदवार, १२८ मतदार
संस्थाचालक : ४ जागा, ८ उमेदवार, १६९ मतदार
प्राचार्य : ८ जागा, १४ उमेदवार, ७८ मतदार
महाविद्यालयीन शिक्षक : १० जागा, ३९ उमेदवार, २ हजार ५८७
तर विद्यापरिषदेच्या - ६ जागांसाठी १९ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार  होते. विद्या परिषद या प्रवर्गासाठी विद्यापीठ शिक्षक तसेच महाविदृयालयीन शिक्षक असे दोन्ही मतदार होते. निवडणूक विभागाचे उपकुलसचिव डॉ.विष्णु क-हाळे, अर्जुन खांड्रे, संजय लांब यांच्यासह विविध समित्यांचे सदस्य अधिकारी, कर्मचारी प्रयत्नशील आहेत.

तीन जण बिनविरोध
अधिसभेच्या तीन जागांसाठी प्रत्येकी एकच उमेदवार वैध ठरल्यामुळे या जागा बिनविरोध आल्या आहेत. यामध्ये संस्थाचालक महिला गटातून अर्चना बाळासाहेब चव्हाण (अर्चना रमेश आडसकर), व नितीन उत्तमराव जाधव (अनूसूचित जमाती प्रवर्ग) तसेच (अनूसूचित जमाती प्राचार्य प्रवर्गातून) डॉ.शिवदास झुलाल शिरसाठ हे बिनविरोध निडणून आले आहेत.

१३ अभ्यास मंडळे बिनविरोध
 दुस-या टप्प्यात ४ विद्याशाखेतील ३८ अभ्यासमंडळासाठी निवडणूक झाली. यामध्ये मानव्यविद्या (१३), विज्ञान व तंत्रज्ञान (१३), वाणिज्य व व्यवस्थापन (पाच) तर आंतरविद्याशाखेतील (सात) अभ्यासमंडळाचा समावेश आहे. यातील ऊर्दू, मानसशास्त्र, मत्स्यशास्त्र, गणित, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरींग, प्राणीशास्त्र, एमबीए, बी.पी.एड, शैक्षणिक प्रशासन, शैक्षणिक तत्वज्ञान, शारीरिक शिक्षण शिक्षक या १३ अभ्यासमंडळाची निवडणुक बिनविरोध झाली. तर सबस्टेंटिव्ह लॉ, प्रोसिजर लॉ, इलेक्ट्रॉनिक्स - टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग, सिव्हील इंजिनिअरिंग व एमसीए या सहा अभ्यासमंडळात एकही पात्र उमेदवार मिळाला नाही. उर्वरित एकूण १९ अभ्यासमंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान झाले. यासाठी १२४ उमेदवार तर १ हजार २४३ मतदार होते. या सर्व अभ्यासमंडळाची मतमोजणीही मंगळवारी सकाळी सुरू झाली. या निकालासोबतच बिनविरोध आलेल्या सदस्यांचेही प्रमाणपत्र मा.कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांनी दिली.

Web Title: Who will get the throne of Adhisabha, Vidya Parishad and Study Board?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.