या गर्दीला कोण रोखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:04 AM2021-04-18T04:04:41+5:302021-04-18T04:04:41+5:30

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारातील हा भाजीपाला विक्रीचा किरकोळ बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी ...

Who will stop this crowd? | या गर्दीला कोण रोखणार?

या गर्दीला कोण रोखणार?

googlenewsNext

औरंगाबाद : जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारातील हा भाजीपाला विक्रीचा किरकोळ बाजार प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. शनिवारी अनेक आडतदुकाने बंद होती, तरीपण विक्रेत्यांनी बाजार गजबजला होता.

शहरात संचारबंदी लागू आहे, पण हा आदेश भाजीपाल्याच्या मोठ्या आडत बाजारपेठेत लागू नाही का, येथे कोरोनाची भीती संपली का, असा प्रश्न पडावा एवढी गर्दी पाहण्यास मिळत आहे.

अत्यावश्यक सेवा म्हणून भाजीपाला, फळे विक्रीला सूट देण्यात आली आहे. यामुळे अनेक बेरोजगार या व्यवसायात शिरले. शहरात भाजीपाला विक्रेत्यांची संख्या ८ ते १० हजारपर्यंत जाऊन पोहोचली आहे.

शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीसाठी दररोज बाजारात आणावा लागतो. अडत्या त्याचा लिलाव करतात व किरकोळ विक्रेते तो खरेदी करून शहरात विक्रीसाठी आणतात. ६० टक्के फळे, भाजीपाला परजिल्ह्यातून, परराज्यातून विक्रीला येतो. तर आसपासच्या ग्रामीण भागातून ४० टक्के भाजीपाला शेतकरी विक्रीला आणतात. अनेक शेतकरी थेट किरकोळ विक्रेते किंवा ग्राहकांना विकतात. विक्रेतेही शेतकऱ्यांकडून भाजीपाला खरेदी करून आडत बाजारातच अंतर्गत रस्त्यावर विक्रीसाठी बसतात. थोडा स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने ग्राहकांची येथे गर्दी उसळते. एकाच वेळी १० ते १५ हजार लोक जमतात. बाजार समितीने पिवळे पट्टे मारले आहेत. मात्र, काही विक्रेते त्यानुसार बसताना दिसत नाही. प्रशासनाचे कोणतेच आदेश पाळले जात नसल्याने येथे गोंधळ उडतो. शनिवारी अनेक आडत दुकानदारांनी आपली दुकाने उघडली नाहीत. बाहेरगावावरून फळ,भाजीपाला मागविला नाही, तरी बाजारात गर्दी उसळलेली होतीच. येथे एकत्र आलेले शेकडो विक्रेते नंतर गावभर विक्री करत फिरतात. यामुळे कोरोनाचा प्रसार वेगाने होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

चौकट

४१ ठिकाणी मंडी भरविण्याचा प्रयत्न फसला

जाधववाडीतील आडत बाजारात होणाऱ्या गर्दीचे विकेंद्रीकरण होण्यासाठी मनपा प्रशासनाने शहरातील ४१ ठिकाणी तात्पुरती मंडी भरविण्याचे नियोजन केले होते, पण त्यास विक्रेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे पुन्हा आडत बाजारात गर्दी होत आहे.

Web Title: Who will stop this crowd?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.