संपूर्ण जगत हे भगवंताचे रुप आहे
By Admin | Published: May 15, 2014 12:07 AM2014-05-15T00:07:40+5:302014-05-15T00:17:32+5:30
पोखर्णी : भगवंत हे अनुभव रूप आहे. सृष्टीतील मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व ईश्वराचे अंश आहेत. प्रत्येक वस्तूत भगवंत आहे. म्हणूनच संपूर्ण जगत हे भगवंताचे रूप आहे,
संपूर्ण जगत हे भगवंताचे रुप आहे पोखर्णी : भगवंत हे अनुभव रूप आहे. सृष्टीतील मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत सर्व ईश्वराचे अंश आहेत. प्रत्येक वस्तूत भगवंत आहे. म्हणूनच संपूर्ण जगत हे भगवंताचे रूप आहे, असे प्रतिपादन साध्वी विश्वेश्वरी देवी यांनी केले. श्रीक्षेत्र नृसिंह पोखर्णी येथे नृसिंह जन्मोत्सवानिमित्त आयोजित भागवत कथेच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. ८ मे रोजी सुरू झालेली संगीत भागवत कथेचा समारोप १४ मे रोजी झाला. साध्वी विश्वेश्वरी देवी म्हणाल्या की, जो मनुष्य माता-पित्यांना मानत नाही, खोटे बोलून धनाची प्राप्ती करतात ते राक्षस वृत्तीचे असतात. मानव असले तरीही समारोपाच्या कार्यक्रमात सुदाम चरित्र सांगितले. श्री कृष्ण- रुक्मिणीचा सजीव देखावा सादर करण्यात आला. मुख्य यजमान द्वारकादास सारडा, संस्थानचे अध्यक्ष एम.आर. वाघ, जि.प.सदस्य राजेश पांचाळ यांनी सपत्नीक देवीजींचा सत्कार केला. मीनाताई सुरेशराव वरपूडकर यांनीही विश्वेश्वरी देवींचा सत्कार केला. भागवत कथेला संगीताची साथ देणारे अशोक शास्त्री तिवारी, कृष्णकांत दुबे, देवेंद्र, राघवेंद्र शास्त्री, कमलेश त्रिपाठी, शीतलप्रसाद , अनुज शास्त्री, नितीन शास्त्री यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. समारोप प्रसंगी सर्व श्रोते व साध्वी विश्वेश्वरी देवी भावनिक झाल्या होत्या. यावेळी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. (वार्ताहर)