ड्रिंक घेत नाही, तरी लिव्हर खराब का झाले? असा प्रश्न करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

By संतोष हिरेमठ | Published: April 19, 2023 11:51 AM2023-04-19T11:51:28+5:302023-04-19T11:52:36+5:30

जागतिक यकृत दिन विशेष : नाॅन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिसचे प्रमाण वाढत असल्याचे तज्ञांचे निरीक्षण

Why did the liver get damaged even if don't drink alcohol? The number of patients asking this question is increasing | ड्रिंक घेत नाही, तरी लिव्हर खराब का झाले? असा प्रश्न करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

ड्रिंक घेत नाही, तरी लिव्हर खराब का झाले? असा प्रश्न करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढतेय

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : ‘डाॅक्टरसाहेब, मी तर ड्रिंक घेत नाही, तरीही माझे यकृत का खराब झाले?’ असा प्रश्न करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरवर्षी १९ एप्रिल रोजी ‘जागतिक यकृत दिन’ असतो. यकृताशी संबंधित आजारांबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस ठरला आहे. अतिप्रमाणात मद्यपान करणाऱ्यांच्या यकृताचे आरोग्य तर धोक्यात येते; परंतु, बदलती जीवनशैली, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मधुमेहामुळेही यकृताचे आरोग्य बिघडण्याचा धोका वाढत आहे. त्यातूनच अनेकांवर यकृत प्रत्यारोपणाची वेळ ओढावते. मराठवाड्यात ३३ रुग्णांना यकृताची प्रतीक्षा आहे. 

यकृताचे काम काय?
यकृताचे काम म्हणजे संसर्ग आणि आजारांशी लढा देणे, ब्लड शुगर कंट्रोल करणे, शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकणे, कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे, रक्त गोठण्यास मदत करणे, पित्त कमी करणे ज्याचे कार्य फॅट तोडणे आणि पचन सुधारणे हे आहे.

यकृत निरोगी कसे ठेवाल?
यकृत निरोगी ठेवण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. चरबीयुक्त पदार्थ टाळावे. जेवणाच्या वेळा पाळणे, विविध फळे, पालेभाज्या, कडधान्य यांचे सेवन करणे, झोपेच्या वेळा निश्चित ठेवणे यांसारख्या सवयी यकृताच्या आजारापासून व्यक्तीला दूर ठेवतात. रोज ३० ते ४५ मिनिटे व्यायाम करावा. पुरेशा प्रमाणात पाणी प्यावे. व्यसन टाळावे. लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह नियंत्रणात ठेवावा.

यकृताच्या आजाराची लक्षणे
- त्वचा व डोळे पिवळ्या रंगाचे दिसणे.
- वजनात झपाट्याने वाढ अथवा घट.
- तळहात प्रमाणापेक्षा जास्त लालसर होणे.
- भूक मंदावणे.
- थकवा येणे, युरिनचा रंग बदलणे.

मराठवाड्यात आजपर्यंत झालेले अवयवदान
- एकूण ३० व्यक्तींचे अवयवदान- यकृतदान- २४

तिसरे कारण हे सायलंट किलर
अतिप्रमाणात मद्यपान, हिपॅटायटिस बी आणि ‘सी’ म्हणजे पांढरी कावीळ तसेच नाॅन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिस या तीन मुख्य कारणांनी यकृत खराब होते. यात तिसरे कारण हे सायलंट किलर म्हणून ओळखले जाते. आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा. नियमितपणे व्यायाम करावा.
- डाॅ. गौरव रत्नपारखी, यकृतरोगतज्ज्ञ

Web Title: Why did the liver get damaged even if don't drink alcohol? The number of patients asking this question is increasing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.