कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत

By साहेबराव हिवराळे | Published: July 8, 2023 08:16 PM2023-07-08T20:16:57+5:302023-07-08T20:17:43+5:30

आजाराचा प्रकार पाहून २५ हजारापासून ते लाखापर्यंतही निधी मिळतो

Why the tension of serious illness? Financial assistance for treatment by the Labor Welfare Board | कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत

कामगारांनो गंभीर आजाराचे टेन्शन कशाला ? मंडळातर्फे उपचारासाठी मिळते आर्थिक मदत

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर :कामगार कल्याण मंडळातर्फे कामगारांना गंभीर दूर्धर आजारप्रसंगी आर्थिक मदत केली जाते. दुर्धर आजारातील १११ कामगारांना २५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आलेली आहे. कामगारांनो, गंभीर आजाराचे टेन्शन कशाला घेताय? मंडळाकडून कामगारांना उपचारासाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. कामगार पाल्यांना मंडळाकडून आर्थिक, आरोग्य, शिष्यवृत्ती, अभ्यासक्रमानुसार निधी पुरवठा केला जातो. त्याचा फायदा मराठवाड्यात कामगारांना व त्यांच्या पाल्यांना देण्यात आला आहे.

काय आहे गंभीर आजार साह्य योजना ?
कामगार व त्यांच्या पाल्यांसाठी मंडळाच्या वतीने हृदयरोग, ॲन्जोप्लास्टी, किडनी ट्रान्सप्लांट, कर्करोग आदी गंभीर आजाराचा सहायता योजनेत समावेश केलेला आहे. त्याचा फायदा कामगार व त्यांच्या कुटुंबीय व पाल्यांना निश्चित झालेला आहे.

कोणत्या आजारासाठी मदत ?
हृदयरोग, ॲन्जोप्लास्टी, किडनी ट्रान्सप्लांट, कर्करोग, गंभीर आजार वगळता नियमात न बसणारे आजार असल्यास आणि कामगारांची उपचारासाठी आर्थिक क्षमता नसल्याने जीव हरवून बसतो. परंतु अशा प्रसंगी कामगार कल्याण मंडळ तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहते. वैद्यकीय व शस्त्रक्रियेचा निधी खात्यावर, दवाखान्यातही जमा केला जातो.

किती रुपयांची आर्थिक मदत ?
आजारानुसार भरीव आर्थिक साह्य देण्यात येत आहे, त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तताही लाभधारकांना करावी लागते. आजाराचा प्रकार पाहून २५ हजारापासून ते लाखापर्यंतही निधीचा आकडा असतो.

२५ कामगारांनी घेतला लाभ
मराठवाड्यात १११ कामगार व पाल्यांना गंभीर आजारप्रसंगी निधी दिलेला आहे. त्यांचे आजार पूर्ण बरे होऊन त्यांनी आता रुटीनप्रमाणे कामावर ये-जा करणे सुरू केलेले आहे.

मंडळाने केली मदत..
आजाराची व उपचाराची सविस्तर कागदपत्रांची यादी कामगार कल्याण मंडळात ऑनलाइनही पाठवावी लागते. त्यानुसार निधी मंजूर करण्यात येतो. आजारात आर्थिक मदत केल्याने फायदा झाला.
- योगेश कवले (कामगार)

नाशिक येथे उपचार..
किडनी ट्रान्सप्लांट प्रसंगी निधीचा विषय आला आणि कामगार कल्याण मंडळ मदतीला धावून आले, त्यांनी वेळेत मदत केल्याने उपचार कामी मदतच झाला आहे.
- किरण मिश्रा (कामगार)

अर्थसहाय्य देण्यास मंडळ तत्पर
कामगार व त्यांच्या कुटुंबीयांच्या आरोग्याची जबाबदारी विमा दवाखान्यावर असून, गंभीर आजारात आर्थिक मदत, तसेच पाल्यांना शिष्यवृती, पाठ्यपुस्तकांसाठीदेखील मदत केली जाते.
- मनोज पाटील, सहायक कल्याण आयुक्त, कामगार कल्याण मंडळ.

Web Title: Why the tension of serious illness? Financial assistance for treatment by the Labor Welfare Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.