वायफायला मुहूर्त मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:41 AM2017-10-31T00:41:48+5:302017-10-31T00:41:52+5:30
दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकानवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती़ औरंगाबाद रेल्वेस्थानकवर ४ जूनपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरुही केली, परंतु नांदेड रेल्वेस्थानकवर मात्र या सेवेला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने रेल्वेस्थानकानवर मोफत वायफाय सुविधा देण्याची घोषणा केली होती़ औरंगाबाद रेल्वेस्थानकवर ४ जूनपासून प्रवाशांसाठी ही सुविधा सुरुही केली, परंतु नांदेड रेल्वेस्थानकवर मात्र या सेवेला अद्यापही मुहूर्त मिळाला नाही़
प्रवाशांकडून कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळणारी रेल्वे असताना प्रवाशांकडून भरघोस उत्पन्न मिळविणाºया रेल्वे प्रशासनाकडून वायफायची सेवा देण्यास कुचराई करण्यात येत आहे़ २०१६-१७ मध्ये ६८ रेल्वेस्थानकांपैकी १० रेल्वेस्थानकाला आदर्श स्टेशन करण्यात येणार होते़ प्रवाशांच्या सुविधेसाठी ६८ कोटी २९ लाख रुपये खर्च करण्याची घोषणा करण्यात आली होती़ त्यामध्ये बुकिंग सुविधा, पाणीपुरवठा, प्रतीक्षा हॉल, आसन व्यवस्था, फलाट, शौचालय, ब्रीज, वेळापत्रक फलक, पार्कींग, डिजिटल वेळापत्रक, एक्सलेटर आदींचा समावेश होता़ नांदेड विभागात येणाºया औरंगाबाद, नांदेड व जालना रेल्वेस्थानकाला डिजिटल करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून काम सुरु करण्यात आले आहे़
४ जून रोजी औरंगाबाद रेल्वेस्थानकावर वायफाय सुविधा देण्यात आली़ नेटवर्कसाठी औरंगाबाद स्टेशनवर एकूण १९ जागांवर टॉवर लावण्यात आले आहेत, परंतु नांदेडमध्ये या सेवेला अद्याप मुहूर्त मिळाला नाही़ त्यामुळे प्रवाशांना या सेवेचा लाभ मिळाला नाही़ रेल्वेच्या अधिकाºयांनी मात्र या विषयावर मौन बाळगले आहे़