गुटख्याची सर्रास विक्री, प्रशासनाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:03 AM2021-03-27T04:03:52+5:302021-03-27T04:03:52+5:30
सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. गर्दी टाळण्यासाठी ...
सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचे दिसत आहे. गर्दी टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद करण्यात आले, मात्र शहरात भरणाऱ्या भाजी मंडईला सध्या बाजाराचे स्वरूप आहे. सामाजिक अंतराचा फज्जा आणि विनामास्क फिरणाऱ्यांची मंडीतील संख्या ही भीतीदायक आहे. तशात पानटपऱ्या, किराणा दुकानांवर विक्री करण्यास बंदी असलेला गुटखा सर्रास विक्री केला जात आहे. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकणाऱ्यांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. मात्र याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.
अनेक पॉझिटिव्ह रुग्णांना लक्षणे दिसत नाहीत. अशा व्यक्ती गुटखा खाऊन थुंकल्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढणार असल्याने, यासंबंधी कठोर कारवाईची मागणी होत आहे.