पत्नी व मुलीचा खून; आरोपीस जन्मठेप
By Admin | Published: February 25, 2017 12:39 AM2017-02-25T00:39:02+5:302017-02-25T00:41:45+5:30
जालना : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्यासह एका वर्षाच्या मुलीचा खून करणारा आरोपी धोंडीराम पंडित बनसोडे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी जन्मठेप व ५ हजार रूपये दंड ठोठावला.
जालना : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेवून तिच्यासह एका वर्षाच्या मुलीचा खून करणारा आरोपी धोंडीराम पंडित बनसोडे यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी जन्मठेप व ५ हजार रूपये दंड ठोठावला.
बदनापूर तालुक्यातील जवसगाव येथे ३१ मे २०१५ रोजी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. आरोपी धोंडीराम बनसोडे याने पत्नी उषा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन ती रात्री घराबाहेर झोपलेली असताना त्यांच्यासह एक वर्षाची मुलगी आकांक्षा यांच्या डोक्यात दगड घालून निर्घृण खून केला व दगड घेऊन तो पळून गेला होता. याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटकेत आले होते. याप्रकरणाचा तपासपूर्ण करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सुनावणी दरम्यान या प्रकरणात एकूण १७ साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजंूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी अभियोक्ता दीपक कोल्हे यांनी काम पाहिले.