परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारणार्या पतीला पत्नीने बदडले; औरंगाबादच्या सिडको बसस्थानक परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2018 07:28 PM2018-01-22T19:28:15+5:302018-01-22T19:31:58+5:30
परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारत बसलेल्या नवर्याला दामिनी पथकाच्या मदतीने पत्नीने चांगलाच हिसका दाखविला. हॉटेलमध्ये अचानक झालेल्या या प्रकाराने तेथील कर्मचार्यांसह ग्राहकही आश्चर्यचकित झाले. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आज दुपारी घडली.
औरंगाबाद : परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये गप्पा मारत बसलेल्या नवर्याला दामिनी पथकाच्या मदतीने पत्नीने चांगलाच हिसका दाखविला. हॉटेलमध्ये अचानक झालेल्या या प्रकाराने तेथील कर्मचार्यांसह ग्राहकही आश्चर्यचकित झाले. ही घटना सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये आज दुपारी घडली.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, जयभवानीनगर येथे राहणारा ३५ वर्षीय सुशील(नाव बदलले) हा लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. पुंडलिकनगर रोडवर त्याचे कार्यालय आहे. विविध कंपन्यांना तो कामगार पुरविण्याचे काम करतो. काही दिवसापूर्वी रत्ना नावाची (नाव बदलेले)एक तरूणी त्याच्याकडे नोकरी मागण्यासाठी आली होती. त्या तरूणीला त्याने त्याच्या कार्यालयातच नोकरीला ठेवले. गेल्या काही दिवसापासून रत्नासोबत त्याची मैैत्री वाढली.
आज दुपारी २ वाजेच्या सुमारास सुशील रत्नाला घेऊन सिडको बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये गेला. तेथे दोघे गप्पा मारत असल्याची माहिती त्याच्या पत्नीला समजली. यामुळे त्याची पत्नी संतप्त झाली आणि त्यास धडा शिकविण्यासाठी त्याने थेट दामिनी पथकाची मदत घेण्याचे ठरविले. सुशील परस्त्रीसोबत हॉटेलमध्ये असल्याची तिने खात्री केली आणि दामिनी पथकाला फोन करून बोलावून घेतले. दामिनी पथकाच्या महिला पोलिसांना सोबत घेऊन तिने थेट सुशील आणि रत्नावर हल्लाबोल केला.यावेळी सुशीलला तिने पोलिसांसमोरच बदडून काढले. एवढेच नव्हे तर रत्नालाही खडेबोल सुनावले. यानंतर दामिनी पथकाच्या वाहनातून सुशील आणि रत्नाला एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे या घटनेची नोंद करण्यात आली.
परस्त्रीयांना सतत बाहेर हॉटेलमध्ये नेऊन मजा करण्याच्या सवयीचा सुशील आहे. याविषयी त्याच्या पत्नीला अनेकदा तक्रारी आल्याने तिने त्याची समजूतही काढली होती.मात्र सुशीलचा बाहेरख्यालीपणा कमी होत नसल्याने आज त्याच्या पत्नीने दामिनी पथकाला सोबत घेऊन हिसका दाखविल्याचे एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले. हा कौटुंबिक वादाचा प्रकार असल्याने सुशीलचे घर पुंडलिकनगर ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने तेथे तक्रार नोंदविण्याचे त्याच्या पत्नीला सांगण्यात आले. शिवाय रत्नानेही तक्रार नोंदविण्यास नकार दिला.