अंधारीनजीक पत्नीने घोटला पतीचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 12:33 AM2018-03-07T00:33:02+5:302018-03-07T00:33:05+5:30
पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीने चक्क पतीचा काटा काढल्याची घटना सोमवारी (दि.५) मध्यरात्री सिल्लोड तालुक्यातील अंधारी-लोणवाडी शिवारात घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंधारी : पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पत्नीने चक्क पतीचा काटा काढल्याची घटना सोमवारी (दि.५) मध्यरात्री सिल्लोड तालुक्यातील अंधारी-लोणवाडी शिवारात घडली. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले.
कृष्णा पांडुरंग पल्हाळ (२५, रा. आसेगाव ता. गंगापूर) असे मयताचे नाव आहे, तर नर्मदा ऊर्फ रेणुका कृष्णा पल्हाळ (२०) असे आरोपी पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, कृष्णा व नर्मदा हे दोन महिन्यांपूर्वी अंधारी-लोणवाडी शिवारात दत्तू सोनाजी सावळे यांच्याकडे मेंढ्या सांभाळण्यासाठी आले होते. दीड वर्षांपूर्वी विवाह झालेल्या या दाम्पत्यामध्ये सोमवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास कडाक्याचे भांडण झाले होते. दरम्यान, भांडणाचा मनात राग धरून नर्मदा हिने मध्यरात्रीच्या सुमारास हातोड्याने पतीच्या गुप्तांगावर तसेच गळ्यावर जोरदार प्रहार केला. यानंतर तिने पतीचा गळा दाबून खून केला.
सिल्लोड ग्रामीणचे सपोनि. विश्वास पाटील यांनी सहकाºयांसह घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, तसेच आरोपी महिलेला ताब्यात घेतले. तिने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. मयतावर सिल्लोड ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी आरोपी महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.पाटील, बीट जमादार मदन नागरगोजे, विलास सोनुने, परमेश्वर शिंदे आदी करीत आहेत.